Akurdi : सीएमएस कलामंदिराचे आकुर्डीत उदघाटन 

एमपीसी न्यूज – आकुर्डी येथील चिंचवड मल्याळी समाजाच्या वतीने आकुर्डी रेल्वे स्टेशनसमोर केरलाभवन मध्ये सुरू करण्यात आलेल्या सीएमएस कलामंदिरचे उदघाटन दिनांक 16 एप्रिल रोजी करण्यात आले. यावेळी आमदार अण्णा बनसोडे,चिंचवड मल्याळी समाजाचे (Akurdi) अध्यक्ष टी.पी. विजयन, सरचिटणीस सुधीर सी. नायर, खजिनदार पी. अजयकुमार, कला मंदिर प्रमुख पी. व्ही. भास्करन, कलावेदीचे संयोजक जी. करुणाकरन, उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन, जॉय जोसेफ, सहसचिव जी. एस. नायर, फॅन्सी विजयन, महिला विभाग समन्वयक प्रविजा विनीत आदी उपस्थित होते.

गुरुशिष्य परंपरेला भारतीय संस्कृतीमध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आधुनिक काळातदेखील कलाकारांनी गुरु शिष्यांची परंपरा कायम जीवंत ठेवली आहे. ही परंपरा सीएमएस कलामंदिर भविष्यात देखील कायम सुरू ठेवतील. असा विश्वास केरळ संगीत नाटक अकादमीचे अध्यक्ष चेंडा वाद्य पंडीत ,पद्मश्री मट्टनूर शंकरनकुट्टी मरार यांनी व्यक्त केला.

Talegaon : रमझान चे उपवास संयम आणि त्यागाची शिकवण देतात – किशोर आवारे

आमदार बनसोडे म्हणाले की, सीएमएस ही संस्था उत्तम दर्जाचे शिक्षण देवून उत्तम नागरीक घडवित आहे. त्यासोबतच कलामंदिर च्या माध्यमातून उत्तम दर्जाचे कलावंत देखील घडविण्याचे कार्य करित आहे. पद्मश्री मरार यांनी या अकादमीत शिकवायला येणार अशी इच्छा व्यक्त केली.(Akurdi) असे झाल्यास या सीएमएस कलामंदिरातून जागतिक दर्जाचे कलावंत घडेल.आमच्या शहराचा नावलौकिक वाढेल. असे मत व्यक्त केले.

 

टी. पी. विजयन म्हणाले की, कलेचा प्रसार करणे हा कला मंदिर उभारण्याचा हेतू आहे. आम्ही प्रसारक म्हणून कार्य करणार त्यामुळे सीएमएस कलामंदिर लवकरच महाराष्ट्रात नावारूपाला येईल यात शंका नाही. यावेळी राजू मिसाळ यांच्या तर्फे आलेल्या सर्व प्रेक्षकांना रोपांचे वाटप करण्यात आले. प्रास्ताविक भाषण पी.व्ही भास्करन यांनी केले. सूत्रसंचालन लता विनोद यांनी तर आभार सुधीर नायर यांनी मानले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.