Chinchwad : मंगलमूर्ती वाड्यात निनादले ‘ॐ नमस्ते गणपतये’चे सूर

एमपीसी न्यूज – ॐ नमस्ते गणपतये.. त्वमेव प्रत्यक्षं तत्त्वमसि.. त्वमेव केवलं कर्तासि.. असे 400 भाविकांच्या मुखातून (Chinchwad) अथर्वशीर्ष पठणाचे सामूहिक स्वर उमटले. ऋषिपंचमीच्या मंगलदिनी सकाळी चिंचवडचे आराध्य दैवत _श्रीमन् महासाधू श्री मोरया गोसावी_ यांच्या पवित्र ऐतिहासिक मंगलमूर्ती वाड्यात आदिशक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले.

संस्कृती संवर्धन व विकास महासंघ, स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ व चिंचवड देवस्थान ट्रस्ट यांच्या संयुक्त माध्यमातून ऋषिपंचमीनिमित्त सकाळी चारशे गणेश भक्तांनी श्री मंगलमुर्ती वाडा, चिंचवड येथे अथर्वशीर्ष पठण केले. गणेश नामाचा जयघोष करीत गणेश भक्ताने सकाळी मंगल समयी प्रसन्नतेची अनुभूती दिली.

Pune : मराठा समाजातील लक्षित गटासाठी सारथी मार्फत उच्च कृषी तंत्रज्ञानावर आधारित प्रशिक्षणाचे आयोजन

पारंपरिक पेहरावातील (Chinchwad) महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी सभामंडपामध्ये गर्दी केली होती. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 11 वे वर्ष होते. दिलीप तांबोळकर यांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि अनिल अडी, राधा धारवाडकर, प्रिया जोग, साक्षी चटणे यांच्या सोबत गणेश भक्तानी 21 वेळा अथर्वशीर्षाचे पठण करीत गणरायाला नमन केले.

हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत भाविकांनी गणरायाला अभिवादन केले. उज्वलाताई कवडे यांनी आरतीने कार्यक्रमाची सांगता केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अजित जगताप यांनी केले. रविकांत कळमकर यांनी स्वागत केले व किसन महाराज चौधरी यांनी आभार व्यक्त केले.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ’,’संस्कृती संवर्धन व विकास महासंघ’ व ‘चिंचवड देवस्थानचे’ प्रमुख कार्यकर्ते व नगरसेवक सुरेश भोईर , शिवानंद चौगुले, माधुरी कवी, अर्चना डबीर, अश्विनी नाटेकर, यशवंत देशपांडे, हरिभाऊ क्षीरसागर, सोमेश्वर बारपांडे, नगरसेविका अश्विनीताई चिंचवडे , मंदिराचे व्यवस्थापक जोशी व सभासदांनी विशेष प्रयत्न केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.