Chinchwad : महिला दिनानिमित्त चिंचवडला चारचौघींशी दिलखुलास गप्पा, दिशा फाऊंडेशनचा उपक्रम

एमपीसी न्यूज – दिशा सोशल फाऊंडेशनच्या वतीने (Chinchwad) जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून रविवारी (दि.5) चिंचवडला चारचौघी या प्रसिद्ध नाटकातील कलावंत, लेखक, दिग्दर्शक यांच्याशी दिलखुलास गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या निमित्ताने महिलांना भेडसावणारे विविध प्रश्न, समस्यांवर आधारित सविस्तर चर्चाही होणार आहे.

चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृहात रविवारी सकाळी 11 वाजता हा गप्पांचा कार्यक्रम होणार आहे. प्रसिध्द अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, मुक्ता बर्वे, कादंबरी कदम, पर्ण पेठे यांच्यासह चारचौघीचे दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, लेखक प्रशांत दळवी या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

Wakad News: ‘पीएमओ’वर तक्रार केल्यानंतरही ‘PMRDA’कडून बेकायदा झोपड्यांवर कारवाईस विलंब’

ज्येष्ठ पत्रकार राज काझी या सर्वांशी संवाद साधणार आहेत. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, चिंचवडच्या नवनिर्वाचित आमदार अश्विनी लक्ष्मण जगताप यांची प्रमुख (Chinchwad) उपस्थिती असणार आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पूजा लांडगे, राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आकांक्षा पिंगळे, आय. आर. एस. माधुरी गरुड, राज्य काव्य पुरस्कार प्राप्त संगीता झिंजूरके यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य खुला आहे. प्रथम येईल, त्यास प्राधान्य राहणार आहे. काही जागा राखीव असतील, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष जगन्नाथ (नाना) शिवले आणि उपाध्यक्ष संतोष बाबर यांनी दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.