Chinchwad : पिंपरी-चिंचवड पोलिसांकडून 50 जणांवर कारवाई

Pimpri-Chinchwad police take action against 50 persons

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सोमवारी (दि. 29) प्रशासनाच्या आदेशाचे पालन न करणाऱ्या 50 जणांवर कारवाई केली आहे. तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये एमआयडीसी भोसरी आणि वाकड पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

लॉकडाऊन सुरु झाल्यापासून पोलिसांकडून ही कारवाई केली जात आहे. प्रशासनाने लॉकडाऊनच्या कालावधीत काही नियम घालून दिले आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी खबरदारी म्हणून काही नियम पाळण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. या आदेशांचे उल्लंघन करणा-यांवर कारवाई केली जात आहे.

सोमवारी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भारतीय दंड विधान कलम 188 नुसार एमआयडीसी भोसरी (16, भोसरी (0), पिंपरी (4), चिंचवड (0), निगडी (2), आळंदी (0), चाकण (0), दिघी (0), म्हाळुंगे चौकी (0), सांगवी (0), वाकड (15), हिंजवडी (13), देहूरोड (0), तळेगाव दाभाडे (0), तळेगाव एमआयडीसी (0), चिखली (0), रावेत चौकी (0), शिरगाव चौकी (0) अशी एकूण 50 जणांवर कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.