Chinchwad : अमित शहा यांच्या दौऱ्यात 64 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई

एमपीसी न्यूज – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत चिंचवड (Chinchwad) येथे रविवारी (दि. 6) सहकार क्षेत्राचा कार्यक्रम पार पडला. अमित शहा यांच्या या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी 64 जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. काही राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना देखील ‘डिटेन्ड’ करण्यात आले होते.

अमित शाह यांच्या दौऱ्यानिमित्त काही राजकीय पक्षांकडून तसेच काही संघटना व व्यक्तींकडून आंदोलन तसेच निषेध व्यक्त करण्यात येणार होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. तसेच काही जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली. शहरातील काही पोलीस ठाण्यांकडून नोटीस देखील बजावण्यात आल्या होत्या.

मंत्र्यांचा ताफा मार्गस्थ होणार असलेल्या मार्गावरील रस्त्याच्या कडेला, पदपथावर तसेच अनधिकृत पार्क केलेल्या हजारो वाहनांना हलविण्यात आले. तसेच पथारीवाले, हातगाडीवाले, फेरीवाले यांना देखील या मार्गावर मनाई करण्यात आली होती.

Pune : अमित शाह आणि जयंत पाटील यांची भेट झाली की नाही? फडणवीस म्हणाले..

अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर माजी नगरसेवक मारुती भापकर यांच्या घरी सकाळपासून पोलीस दाखल झाले होते. तसेच इतर काही जणांकडेही पोलीस गेले होते. अनेकांना पोलिस ठाण्यांमध्ये आणले होते. अमित शाह यांचा कार्यक्रम होऊन त्यांचा ताफा मार्गस्थ झाल्यानंतर दुपारी पोलीस ठाण्यातून त्यांना सोडण्यात (Chinchwad) आले.

वाकड (41), चिंचवड (22), निगडी (11), चिखली (5), भोसरी (2), पिंपरी (1), सांगवी (2) पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.