Chinchwad : पुणे-वलसाड-पुणे एक्सप्रेस गाडीचे चिंचवड रेल्वेस्थानकात स्वागत

एमपीसी न्यूज – मध्य रेल्वेच्या वतीने सुट्टीच्या हंगामात पुणे-वलसाड-पुणे ही नवीन एक्सप्रेस गाडी मंगळवारपासून सुरु करण्यात आली. चिंचवड रेल्वे स्थानकात इंजिनला पुष्पहार घालून या गाडीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

यावेळी चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, सामाजिक कार्यकर्ते मनोहर जेठवाणी, चिंचवड रेल्वे स्थानक प्रमुख अनिल नायर, सहाय्यक स्थानक प्रमुख निळकंठ सूर्यवंशी, नारायण भोसले, मुकेश चुडासमा, नयन तन्ना, हार्दिक जानी, इक्बाल सय्यद, डी. घुले, नंदू भोगले, जॉनी फ्रान्सीस, अजित कंजवाणी, मनोहर जेठवाणी, भगवानदार खत्री, किरण रामनानी, चंदू रामनानी, दीपक लोहाना, कैलास लोखवानी, सुरेश साठे, प्रविण जाधव, मनोज फोंडगे, सूरज आसदकर आदी उपस्थित होते. चिंचवड प्रवासी संघाच्या वतीने पेढे वाटण्यात आले.

ही गाडी आठवड्यातून दर मंगळवारी व गुरूवारी पुणे येथून पहाटे 5 वाजून 35 मिनिटांनी सुटून चिंचवड येथे 5 वाजून 53 मिनिटांनी येणार आहे. लोणावळा, कल्याण, भिवंडी रोड, वसई रोड, विरार, भोईसर, वापी मार्गे वलसाड येथे दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी पोहचणार आहे. वलसाड येथून त्याच दिवशी दुपारी 2 वाजून 35 मिनिटांनी सुटून चिंचवड येथे रात्री 8 वाजून 23 मिनिटांनी येऊन ती पुढे पुणे स्थानकावर पोहोचेल.

चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार यावेळी म्हणाले, “पुणे-मुंबई सिंहगड एक्सप्रेसला गर्दी मोठ्या प्रमाणात असते व या गाडीला कल्याण येथे थांबा असल्यामुळे पिंपरी चिंचवड येथील सिंधी बांधवांचे अनेक नातेवाईक कल्याण, उल्हासनगर परिसरात वास्तव्यास आहे. त्याची सोय होणार आहे. आता पुणे-वलसाड-पुणे या एक्सप्रेस गाडीमुळे पनवेलला जाण्याची आवश्यकता लागणार नाही. थेट वसई रोड येथे या गाडीला थांबा मिळाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे”

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.