Chinchwad : मराठमोळी नऊवारी साडी नेसून चिंचवडची रमीला करणार बाईकवर जगभ्रमंती

एमपीसी न्यूज : तुम्ही रायडर पुरुषाला जग भ्रमंती करताना (Chinchwad) ऐकले असेल, पाहिले असेल. अंगावर जाडजूड जॅकेट, पॅन्ट, हेल्मेट घालून बरेच जण बाईकवरून राज्य, देश, जग भ्रमंती करतात. पण, सांस्कृतिक पेहराव करून अगदी नऊवारी साडी नेसून जगभ्रमंती कोणी करत असेल? तर आश्चर्याचा धक्काच बसेल. होय, असाच सुखद धक्का देणार आहे चिंचवडमधील मराठमोळी वैमानिक रमीला लटपटे.

आपल्या पारंपारिक अशा नऊवारी साडीत 9 मार्च पासून 27 वर्षीय रमीला जग भ्रमंतीसाठी  मोटरसायकलवरून निघणार आहे. ती अंदाजे 20 ते 30 देशांतून 100,000 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. त्यामुळे ती 1 वर्षानंतर म्हणजेच 8 मार्च 2024 रोजी भारतात परतणार आहे.

INTUC : राजन नायर यांची इंडियन नॅशनल ट्रेड युनियनच्या सेक्रेटरी पदी निवड

रमीला ही वैमानिक सोबत एक उद्योजिकाही आहे. राज्याच्या वैशिष्ट्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन करून महाराष्ट्राच्या संस्कृतीच्या विविध पैलूंना प्रोत्साहन देण्यासाठी ती हा प्रवास करणार आहे. यासाठी तिला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.

रमीला 9 मार्च रोजी दुपारी 4:30 वाजता मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून प्रवासाला (Chinchwad) सुरुवात करणार आहे. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शंतनू नायडू, प्रसाद नगरकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आणि सुरेश भोईर ध्वजवंदनासाठी उपस्थित राहणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.