Nigdi News : नवंकोरं च्या माध्यमातून महिलांनी लुटला हलक्या फुलक्या गप्पा, कविता अन गझलचा आनंद  

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनानिमीत्त अनुष्का स्त्री कलामंच व श्री समर्थ युवक प्रतिष्ठान यांच्यावतीने रविवारी (दि.5) सायंकाळी निगडीतील मनोहर वाढोकर सभागृह येथे नवंकोरं (कवितेच्या सावलीत घडताना)  या कविता व गप्पांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. (Nigdi News) यावेळी अगदी सहज गप्पा मधून कवी मने उलगडली त्यातून अनेक कविता, गझल सादर करण्यात आल्या ज्याचा उपस्थित महिलांनी मनमुराद आनंद लुटला.

यावेळी अभिनेत्री स्पृहा जोशी आदित्य दवणे, संकेत म्हात्रे व प्रथमेश पाठक यांनी कोण्यताही निवेदना शिवाय केवळ गप्पांमधून नवंकोरं या कार्यक्रमाचे सादरीकरण केले. यावेळी मंचावर तसेच पवना सहकारी बँकेचे संचालक अमित गावडे व अनुष्का स्त्री कला मंचच्या अध्यक्ष शर्मिला महाजन या उपस्थित होत्या तर सभागृह हे 1200 महिलांनी खचाखच भरले होते.

कविता बरोबरच कार्यक्रमात महाराष्ट्र साहित्य परिषदचे राजन लाखे, प्राधिकरणातल्या माधुरी मंगुळकर, नवयुग साहित्य मंडळचे राज आहिरराव, ऋतू रंग रमेश वकणीस, मधुश्रीच्या माधुरी ओक, रसिक साहित्य मंडळाच्या श्यामला खळतकर,शब्दरंग चे चंद्रशेखर जोशी व ज्योती काणेकर यांचा सत्कार करण्यात आला. तसेच उपस्थित असणाऱ्या राष्ट्रीय खेळाडू तनया सप्ताश्व, ईश्वरी मोरेश्वर अवसरे या दोघींचा ही सत्कार करण्यात आला.

Chinchwad : मराठमोळी नऊवारी साडी नेसून चिंचवडची रमीला करणार बाईकवर जगभ्रमंती

या कार्यक्रमात कोणतीही औपचारिकता न पाळता सहज गप्पा मधून कविता व गझल यांचा प्रवास करण्यात आला. यावेळी पथमेश पाठक यांनी सादर केलेल्या साडी खरेदी या व स्पृहा जोशी यांनी सादर केलेल्या वेगळं व्हायचय मला या कवितांना वन्स मोर आला. (Nigdi News) प्रमावरच्या, सामाजिक तसेच विनोदी, हलक्याफुलक्या कविता कार्यक्रमात सादर करण्यात आल्या. संकेत म्हात्रे यांनी सादर केलेली शेअरींग हि सध्या सोशल मिडीवर ज्या प्रमाणे सर्व काही शेअर करण्याची स्पर्धा दिसते त्यावर भाष्य करणारी होती, ज्यामुळे सर्व उपस्थित हे अंतर्मुख झाले होते.यावेळी समर्थ योग केंद्रच्या सेन्हल भिंगारकर यांनी पथनाट्यातून महिला त्यांच्या दैनंदिन कामात सुद्धा योग करता येतो हे सांगितले.

महिलादिनामीत्त आयोजीत केल्या जाणाऱ्या साहित्यिक कार्यक्रमाचे हे 22 वे वर्ष होते. अनुष्का स्त्री कला मंचव निगडी परिसरातील इतर साहित्यिक मंडळे आवर्जून महिला (Nigdi News) दिनानिमीत्त साहित्यिक कार्यक्रम महिलांसाठी आयोजित करतात. यावेळी कार्यकआमाचे प्रास्थाविक करताना शर्मिला महाजन यांनी शांता शेळके या साहित्य कट्ट्यासाठी जागा उपलब्ध करुन द्यावी असे हान केले. ज्याला नगरसेवक अमित गावडे यांनी कट्ट्यासाठी उत्तम जागा देण्याचे आश्वासन दिले.

या कार्यक्रमाचे नियोजनासाठी वृंदा गोसावी, दिपा चिरपुटकर, गीता कदम, समृद्धी पैठणकर, स्वाती धर्माधिकारी, शामल जम्मा,अनुजा दोशी, शामला खळदकर, उषा गरभे, सुनंदा सुपनेकर यांनी सहाय्य केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.