Chinchwad : मनातील षड्रिपूना बाहेर काढण्यासाठी नित्य भागवत कथा श्रवण करा- श्री ठाकूर भारत भूषण महाराज

एमपीसी न्यूज- आपल्या मनामध्ये परमेश्वराला स्थापित केले की मनातील काम,क्रोध, लोभ, मोह, मद आणि मत्सर बाहेर पडून आपले जीवन धन्य होते. त्यासाठी नित्य भागवत कथा श्रवण केली पाहिजे असा संदेश श्री ठाकूर भारत भूषण महाराज यांनी दिला. श्री साई मित्र मंडळ, श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री साईबाबा प्रकटदिन आणि रामनवमी शाहूनगर यात्रा महोत्सव तसेच श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामध्ये भागवत कथा सांगताना ते बोलत होते.

या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी शनिवारी (दि. 6) दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भव्य कलश रथयात्रा काढण्यात आली. यामध्ये हजारो भाविक अत्यंत भक्तिभावाने सहभागी झाले होते. चाकण येथील ब्रह्मनाद ढोल पथक हे या रथयात्रेचे प्रमुख आकर्षण ठरले. ढोल ताशांच्या गजरात निघालेली कलश रथयात्रा पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी गर्दी केली होती. यावेळी दिव्य ज्योती जागृती संस्था दिल्ली येथील स्वामी चिदानंद महाराज उपस्थित होते.

त्यानंतर मथुरा, (वृंदावन) येथील पंडित श्री ठाकूर महाराज यांच्या सुमधुर वाणीमधून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला प्रारंभ झाला. आपल्या मनामध्ये परमेश्वराला स्थापित करून नित्य भागवत कथेचे श्रावण केल्यास मनातील षड्रिपू बाहेर पडून जीवन धन्य होते असा त्यांनी संदेश दिला. हजारो भाविक दररोज भागवत कथा ऐकण्यासाठी उपस्थित राहत आहेत. या भागवत कथा सोहळ्याचे दररोज यु ट्यूब वर थेट प्रक्षेपण केले जात आहे.

शनिवारी (दि. 13) या सोहळ्याचा समारोप सिन्नर येथील हभप प्रकाश महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (दि. 6) ते शुक्रवार (दि. 12) एप्रिल दरम्यान सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा चालू असून बहुसंख्य भाविक या पारायण सोहळ्याचा लाभ घेत आहेत. व्यासपीठ चालक म्हणून हभप चंद्रकांत कुलकर्णी तसेच साईभक्त साईप्रेमी काम पाहत आहेत. जास्तीतजास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक महेश चांदगुडे, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुप्रियाताई चांदगुडे, मुख्य यजमान टी एन तिवारी, निमंत्रक भगवानराव मुळे यांनी केले आहे. हा सोहळा शनिवार (दि. 6) ते शनिवार (दि. 13) एप्रिल दरम्यान साईमंदिर, डॉ. डी वाय पाटील शाळेशेजारी शाहूनगर येथे सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.