Chinchwad : गोल्ड मॅन पहिले की मी घाबरतो- खासदार संभाजी राजे

एमपीसी न्यूज- अंगावर खूप सोने घालायचे, सोन्याचे जॅकेट घालायचे. महिलांनी सोने घातले पाहिजे पण पुरुष ते का घालतात हेच मला समजत नाही.हे एवढे सोने आणायचं कुठून ? त्यामुळे हे गोल्ड मॅन पहिले की मी घाबरतो अशा शब्दात खासदार संभाजी राजे यांनी अंगावर सोने घालून हिंडणाऱ्या गोल्ड मॅनला टोला लगावला. ही फॅशन सध्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत असल्याबद्दल त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली. पिंपरी-चिंचवडमध्ये खासदार श्रीरंग बारणे सोशियल फाऊंडेशनतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

याबाबत संभाजी राजे यांनी एक किस्सा सांगितल्यावर उपस्थितांमध्ये एकाच हशा पिकला. संभाजी राजे म्हणाले, ” एकदा सात-आठ गोल्ड मॅन माझ्या शेजारी बसले होते आणि मी त्यांच्यामध्ये बसलो होतो. त्यांना पाहून मी घाबरून गेलो होतो. आमच्याकडे सोनं असून देखील ते मी दाखवत नाही. आणि इथं अंगावर सोने घालून सात आठ गोल्ड मॅन माझ्या बाजूला बसले होते. त्यानंतर माझं भाषण सुरू झालं त्यांना वाटलं राजे आमचं कौतुक करतील. मात्र, मी बोलत असताना त्यांना शालजोडीत मारले. मी म्हटलं ‘तुम्ही पॅन्ट देखील सोन्याची घेतली तरी माझी हरकत नाही. पण, तुमची सामाजिक भावना महत्वाची आहे. पाच कोटींचं सोन घेतलं आणि पाच लाखांची मदत केली तरी खूप आहे’ त्यानंतर एकही गोल्ड मॅन मला पुन्हा त्या व्यासपीठावर दिसला नाही. तुम्ही कामाने गोल्ड मॅन व्हा, असा सल्लाही खासदार संभाजी राजे यांनी उपस्थितांना दिला.

दुर्दैवाने ही फॅशन पुण्याकडून सध्या कोल्हापूर आणि पश्चिम महाराष्ट्राकडे सरकत असल्याबद्दल संभाजी राजे यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.