Chinchwad : शाहूनगर येथे शनिवारपासून श्री साईबाबा प्रकटदिन व रामनवमी सोहळा

एमपीसी न्यूज- श्री साई मित्र मंडळ, श्री साई मंदिर देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने श्री साईबाबा प्रकटदिन आणि रामनवमी शाहूनगर यात्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा शनिवार (दि. 6) ते शनिवार (दि. 13) एप्रिल दरम्यान साईमंदिर, डॉ. डी वाय पाटील शाळेशेजारी शाहूनगर येथे संपन्न होणार आहे. या निमित्त श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळा, श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा, संगीतरजनी अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवारी (दि. 6) दुपारी साडेतीन ते साडेपाच या वेळेत भव्य कलश रथयात्रा काढण्यात येणार आहे. यावेळी दिव्य ज्योती जागृती संस्था दिल्ली येथील स्वामी चिदानंद महाराज उपस्थित राहणार आहेत. दिव्य ज्योती जागृती संस्था, चाकण येथील ब्रह्मनाद ढोल पथक हे या रथयात्रेच्या प्रमुख आकर्षण असणार आहे.

  • त्यानंतर मथुरा, (वृंदावन) येथील पंडित श्री ठाकूर महाराज यांच्या सुमधुर वाणीमधून श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याला प्रारंभ होईल. शनिवारी (दि. 13) या सोहळ्याचा समारोप सिन्नर येथील हभप प्रकाश महाराज पवार यांच्या काल्याच्या कीर्तनाने होणार आहे. त्याचप्रमाणे शनिवार (दि. 6) ते शुक्रवार (दि. 12) एप्रिल दरम्यान सकाळी साडेनऊ ते साडेबारा वाजेपर्यंत श्री साई सच्चरित्र पारायण सोहळा होणार आहे. व्यासपीठ चालक म्हणून हभप चंद्रकांत कुलकर्णी तसेच साईभक्त साईप्रेमी काम पाहणार आहेत.

शनिवारी (दि. 13) रोजी सकाळी 7 ते साडेनऊ या वेळेत श्री साईबाबांना महाअभिषेक, होमहवन, महायज्ञ या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर दुपारी 1 ते 3 व संध्याकाळी 6 ते 10 महाप्रसाद होणार असून भाविकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

  • संध्याकाळी 6 ते रात्री साडेनऊ दरम्यान नंदू नेटके व सहकारी प्रस्तुत जय मल्हार संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्यामध्ये सहभागी भाविकांना श्री साई ग्रंथ व सलग सात दिवस चहा नाश्त्याची सोय करण्यात आली आहे. दररोज पाच भाग्यवान भाविकांना श्रीमद भागवत कथा ग्रंथ वाटप ‘हरी कोणा घरी’ व तैलचित्र भेट देण्यात येणार आहे.

मागील 15 वर्षांपासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येत असून हजारो भाविक या सोहळ्याचा लाभ घेतात. जास्तीतजास्त भाविकांनी या सोहळ्याचा लाभ घ्यावा असे आवाहन उद्योजक महेश चांदगुडे, कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुप्रियाताई चांदगुडे, मुख्य यजमान टी एन तिवारी, निमंत्रक भगवानराव मुळे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.