Chinchwad : चिंचवडमध्ये शनिवारी रंगणार ‘तालचक्र’

एमपीसी न्यूज – अक्षय तृतीयेच्या निमित्ताने चिंचवड देवस्थान ट्रस्ट (Chinchwad) आणि पुनित बालन ग्रुप यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शनिवारी (दि.22) तालचक्र हा शास्त्रीय गीतांचा कार्यक्रम आयोजित करण्यात  आलेला आहे. याबाबतची माहिती देवस्थानचे मुख्य विश्वस्त श्री मंदार महाराज देव यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली.

चिंचवड गावातील श्री मोरया गोसावी महाराज संजीवन समाधी मंदिरा शेजारील देऊळमळा पंटागणात शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजता हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात  पं तैफिक कुरेशी यांचा मुलगा शिखरनाद कुरेशी यांचे जेंबे वादन होणार आहे. पद्मश्री विजय घाटे यांचे तबला वादन तसेच गायक शौनक अभिषेकी विविध शास्त्रीय व सुगम गीते सादर करणार आहेत.

Pune : देवेंद्र फडणवीस तर सुपरमॅन – नाना पटोले

शीतल कोलवालकर कत्थक नृत्याविष्कार सादर करणार असून, अभिषेक शिनकर हार्मोनियम वादनाची साथ करणार आहेत. या कार्यक्रमासाठी सुहाना, कोहिनूर ग्रुपचे सहकार्य लाभले आहे.(Chinchwad) हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांनी जास्तीत-जास्त संख्येने उपस्थित राहून या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.