Pune : देवेंद्र फडणवीस तर सुपरमॅन – नाना पटोले

एमपीसी न्यूज : ‘मिशन नो पेंडसी, ऑफिस वर्क क्लिअरिंग पेंडनसीज कार्यालयीन कामकाज’ असा मजकूर असलेला फोटो भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट केला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. त्याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की,  सहा सात जिल्ह्याचे पालकमंत्री असणार देवेंद्र फडणवीस हे  सुपरमॅन आहेत.(Pune) त्याच बरोबर अनेक खाती त्यांच्याकडे आहेत.काही दिवसांपूर्वीच अधिवेशन झाले.त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस यांच्याकडे असलेल्या खात्यांची अवस्था काही झाली होती.हे राज्यातील जनतेने पाहिले आहे.तसेच त्यांच्या एका ही मंत्र्याला अधिवेशन काळात उत्तर देता आले नाही.अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना नाना पटोले यांनी टोला लगावला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर द्यावे : नाना पटोले

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहोळ्या दरम्यान नागरिकाचा बळी गेला आहे. त्याबाबत नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की,महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहोळ्याच्या कार्यक्रमास जवळपास 20 लाख नागरिक आले होते. या संख्येचा अंदाज पोलीस यंत्रणेला नव्हता का ? त्याही पुढे जाऊन या कार्यक्रमाला (Pune) राज्य सरकारने तब्बल साडे तेरा कोटी रुपये खर्च केले.तो पैसा नेमका कुठे गेला.त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी ना छत ना पाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था केली नव्हती आणि त्यात उष्माघातामुळे निष्पाप नागरिकांचा बळी गेला.त्यामुळे एवढ्या कोट्यावधी रुपयांच सरकारने केले काय याबाबत उत्तर दिले पाहिजे.

मात्र या सरकार कडून कोणत्याही प्रकारची उत्तर दिली जात नाही. यातून या सरकारची मानसिकता दिसून येत आहे. तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहमंत्रीपद असल्याने किमान त्यांनी तरी उत्तर द्यावे हीच आमची अपेक्षा आहे.त्यामुळे आम्ही राज्यातील दुष्काळ,महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहोळ्या (Pune) दरम्यान झालेल्या नागरिकांचा बळी यासह अनेक प्रश्नासाठी एक दिवसा करीता विधी मंडळाचे अधिवेशन बोलविण्यात यावे.अशी मागणी राज्यपाल रमेश बैस यांच्याकडे केल्याच त्यांनी सांगितले….

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.