Chinchwad : ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी चालत जात असताना दुचाकीवरून आलेल्या दोन चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. ही घटना गुरुवारी (दि. 4) सायंकाळी साडेसातच्या सुमारास हनुमान मंदिराजवळ शाहूनगर, चिंचवड येथे घडली.

अनिता राजगोंड पाटील (वय 60, रा. शाहूनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार दोन चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिता पाटील गुरुवारी सायंकाळी रस्त्याने पायी जात होत्या. त्या शाहूनगरमधील हनुमान मंदिराजवळ आल्या असता काळ्या रंगाच्या पल्सार दुचाकीवरून आलेल्या दोन चोरटयांनी त्यांच्या गळ्यातील 50 हजार रुपये किमतीचे दोन तोळ्यांचे सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून नेले. एमआयडीसी भोसरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.