Chinchwad : सात दिवसांत नियमभंग करणा-या साडेसहा हजार वाहनचालकांकडून 20 लाखांचा दंड वसूल

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने विशेष मोहीम राबवली. ज्यामध्ये विविध प्रकारे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणा-या सहा हजार 699 जणांवर खटले नोंदवून 19 लाख 62 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. 24 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत ही मोहीम राबविण्यात आली.

वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करून वाहन चालविल्यामुळे अनेक अपघात होतात. त्या अपघातांमध्ये अनेकांचा नाहक बळी जातो. त्यामुळे अशा बेशिस्त वाहन चालकांचा शिस्तीचा धडा देणे गरजेचे आहे. यासाठी पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेने 24 फेब्रुवारी ते 1 मार्च या कालावधीत शहरातील दहा वाहतूक विभागांमध्ये विशेष मोहीम राबवली. या मोहिमेत नियमभंग करणा-या वाहनचालकावर तात्काळ कारवाई करून दंड ठोठावण्यात आला.

कारवाई (केसेस संख्या) आणि आकारलेला दंड

# जॅमर, नो पार्किंग (2984) – 6 लाख 19 हजार 600 रुपये
# वाहन चालवताना मोबाईलवर बोलणे (893) – 1 लाख 78 हजार 600 रुपये
# ट्रिपल सीट (814) – 1 लाख 62 हजार 800 रुपये
# रिक्षा कारवाई (688) – 2 लाख 21 हजार 800 रुपये
# सिग्नल तोडणे (676) – 1 लाख 35 हजार 200 रुपये
# विरुद्ध दिशेने वाहन चालवणे (644) – 6 लाख 44 हजार रुपये
# एकूण (6699) – 19 लाख 62 हजाररुपये

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.