Chinchwad : शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्या

एमपीसी न्यूज – शहर पोलीस दलातील पोलीस निरीक्षकांच्या (Chinchwad) अंतर्गत बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी मंगळवारी (दि. 3) रात्री उशिरा दिले. 

Today’s Horoscope 04 October 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीराम पोळ यांची शिरगाव पोलीस ठाण्यात बदली झाली आहे. तर वाकडचे पोलीस निरीक्षक (गुन्हे) रामचंद्र घाडगे यांची सांगवी पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक पदावर बदली (Chinchwad) करण्यात आली आहे.

शिरगावच्या पोलीस निरीक्षक वनिता धुमाळ यांची आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली आहे तर विठ्ठल साळुंखे यांची नियंत्रण कक्षातून वाकड (गुन्हे) पोलीस ठाण्यात बदली (Chinchwad)  झाली .

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.