Chinchwad : अधूनमधून पडणाऱ्या वादळी पावसामुळे मागील 24 तासात तीन ठिकाणी झाडे पडली

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात अधूनमधून वादळी(Chinchwad)वाऱ्यासह पाऊस पडत आहे. मागील 24 तासात आलेल्या अशा पावसामुळे आकुर्डी, निगडी प्राधिकरण आणि काळेवाडी या तीन ठिकाणी झाडे पडली आहेत.

अग्निशमन विभागाने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. 30) सकाळी 9.30 वाजताच्या (Chinchwad) सुमारास विशाल राठोड यांनी गंगानगर कॉर्नर, आकुर्डी गावठाण येथील वॉशिंग सेंटर जवळ झाड पडल्याबाबत माहिती दिली. त्यानुसार प्राधिकरण अग्निशमन दलाने घटनास्थळी जाऊन रस्त्यावर पडलेले झाड बाजूला केले.

Maharashtra : गणेशोत्सवाला येणारे बीभत्स स्वरूप वेळीच थांबले पाहिजे – राज ठाकरे

त्यानंतर दुपारी 12.30 वाजताच्या सुमारास प्रस्तावित महापौर निवासस्थानालगतच्या जागेवरील(Chinchwad) झाड पडल्याची माहिती माजी नगरसेविका शर्मिला बाबर आणि भाजपचे पदाधिकारी अनुप मोरे यांनी अग्निशमन विभागाला दिली. हे झाड सिमाभिंतीच्या कठड्याला अडकले असल्याने ते झाड पडून अपघात होण्याची शक्‍यता होती. त्यामुळे ते झाड कापून काढण्यात आले. यामुळे संभाव्य अपघात टळला.

झाड पडल्याची तिसरी घटना रविवारी (दि. 1) सकाळी 9.34 वाजता काळेवाडीतील तापकीर नगरमधील श्रीशक्‍ती कॉलनी येथे घडली. संजय राठोड यांनी याबाबत माहिती दिली. मात्र हे झाड नाला आणि सोसायटीची सिमाभिंत या दरम्यान पडले होते. अधांतरी असलेले हे झाड कापण्याबाबत उद्यान विभागाला कळविण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.