Chinchwad : वाहनाला कट मारल्याच्या कारणावरून दोघांना बेदम मारहाण

एमपीसी न्यूज –  वाहनाला कट मारल्याच्या( Chinchwad ) कारणावरून तिघांनी मिळून दोघांना बेदम मारहाण केली. ही घटना रविवारी (दि. 14) सायंकाळी पाच वाजता वाल्हेकरवाडी रोड, चिंचवड येथे घडली.

Aalandi : ग्रामीण रुग्णालया शेजारील कचरा संकलन केंद्र स्थलांतरीत करावे- मनसे

सिद्धेश्वर बालाजी माळी (वय 24, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार भीमराव वाघमारे, आदित्य वाघमारे, प्रभाकर शिंदे (सर्व रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांच्या बहिणीचे पती हे सोबत जात होते. त्यावेळी त्यांच्या वाहनाला आरोपींच्या वाहनाने कट मारला. त्यावरून आरोपींनी फिर्यादी आणि त्यांच्या दाजींना शिवीगाळ करून लोखंडी रॉड ( Chinchwad ) आणि दगडाने मारून जखमी केले. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.