Chinchwad : महिलांनीच महिलांचा सन्मान करावा – डॉ. प्रतिमा इंगोले

एमपीसी  न्यूज – शहरी भागातील महिला दैनंदिन जीवनामध्ये ( Chinchwad)  ग्रामीण महिलेवर अवलंबून असतात. महिलांनीच महिलांचा सन्मान करावा असे आवाहन ज्येष्ठ लेखिका व कवी प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांनी केले.

शिवतेजनगर येथील श्री स्वामी समर्थ ज्येष्ठ नागरिक संघ आणि कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. या दिवसाचे औचित्त साधून ज्येष्ठ लेखिका व कवी प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले यांचे ‘शहरी व ग्रामीण स्त्रीचे अंतरंग” या विषयावर व्याख्यान झाले.  ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष  प्रा. हरिनारायण  शेळके यांनी प्रास्ताविकामध्ये  जागतिक महिला दिन कधी व कसा सुरू झाला याची पार्श्वभूमी सांगितली. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिक संघाचा दहा वर्षाचा आढावा घेतला. माजी नगरसेवक नारायण बहिरवाडे अध्यक्ष असलेल्या कै. सदाशिव बहिरवाडे प्रतिष्ठानच्या वतीने कर्तुत्वान महिलेला ” कर्तुत्वान महिला 2024 ” या पुरस्काराने घरकुल येथील  मोहिनी शिराळकर यांना सन्मानित करण्यात आले.

Aundh-Ravet : औंध-रावेत मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने  उपस्थित सर्वमहिलांना भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. नारायण  बहिरवाडे यांनी मनोगत व्यक्त करताना स्त्रियांच्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश देणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे अखंड स्मरण करावे. कारण त्यांच्यामुळेच आज स्त्रिया प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटत आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षा पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या वृषाली मरळ होत्या. महिलांनी शासकीय योजनेचा लाभ घ्यावा असे याप्रसंगी त्यांनी सांगितले.

याप्रसंगी प्रमुख वक्त्या प्रा. डॉ. प्रतिमा इंगोले  यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर कविता सादर केल्या. कार्यक्रमाचे संयोजन स्वामी समर्थ जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष प्रा. हरि नारायण शेळके  यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महिला मंडळाच्या कार्याध्यक्षा सारिका रिकामे यांनी केले. शिंदे काकू यांनी आभार मानले. कार्यक्रमास परिसरातील अनेक महिला सदस्या व पुरुष ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने हजर होते. सदर कार्यक्रम अतिशय उत्साहात आणि दिमागदारपणे पार ( Chinchwad)  पडला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.