Pune: वसंत मोरे राष्ट्रवादीत जाणार ? 

एमपीसी न्यूज – मनसेचे खंदे नेते असलेल्या वसंत मोरे यांनी पक्षाचा (Pune)राजीनामा दिल्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) या पक्षात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
मनसेमध्ये त्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखविली. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. आगामी पुणे लोकसभा निवडणुकीत मोरे हे मनसेतर्फे प्रबळ दावेदार होते. मात्र, पक्षाच्या अंतर्गत गटबाजीचा फटका त्यांना सामना करावा लागला.
मोरे यांनी काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे तेव्हाच ते शरद पवार यांच्या सोबत जाणार असल्याची कुजबुज सुरू होती.

 

Aundh-Ravet : औंध-रावेत मार्गावरील वाहतूक कोंडी कमी होणार

कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या गरीब शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या वसंत कृष्णाजी मोरे म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणातील धगधगते वादळ ठरले आहे. शेती आणि इतर व्यवसाय करणारे मोरे यांचे नेतृत्व निर्भीड आणि संघर्षमय राहिले आहे.
वसंत मोरे यांनी राजीनामा दिल्यानंतर वसंत मोरे कोण ? त्यांची राजकीय कारकीर्द सतत चर्चेत राहिली. नगरसेवक, गटनेते, विरोधी पक्षनेते पद मोरे यांनी मनसेतर्फे भूषविले आहेत. त्यांच्या अचानक राजीनाम्यामुळे कार्यकर्त्यांना धक्काच बसला आहे.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.