Chinchwad : दुरुस्तीला दिलेल्या लॅपटॉपमधील फोटो चोरून तरुणीला अश्लील मेसेज पाठवल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – तरुणीने दुरुस्तीसाठी दिलेल्या लॅपटॉपमधील फोटो परस्पर काढून घेतले. तसेच तरुणीला व्हाट्स अपवरून अश्लील मेसेज केले. याप्रकरणी चिंचवड पोलिसांनी एक तरुणाला अटक केली आहे. हा प्रकार डी सी सी इन्फोटेक प्रा. लि . चिंचवड येथे 19 ते 21 जून या कालावधीत घडला.

तुषार दत्तात्रय थोरवे (वय 23, रा. चिंचवड) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी 22 वर्षीय तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तुषार चिंचवड येथील डी सी सी इन्फोटेक प्रा. लि. या दुकानात काम करतो. पीडित तरुणीने तिचा लॅपटॉप या दुकानात दुरुस्तीसाठी दिला होता. तुषार याने लॅपटॉप दुरुस्त करण्याच्या बहाण्याने लॅपटॉप मधील तरुणीचे फोटो काढून घेतले. 19 ते 21 जून या कालावधीत त्याने तरुणीच्या व्हाट्स अप नंबरवर अश्लील मेसेज केले. तसेच तरुणीला आणि तिच्या मित्राला बघून घेण्याची धमकी दिली. याबाबत तरुणीने चिंचवड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. पोलिसांनी तुषारला अटक केली आहे. चिंचवड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.