Pune : सिव्हील कोर्ट ते रामवाडी मेट्रो मार्ग निर्मितीस वेग

एमपीसी न्यूज – कोर्टापासून रामवाडी पर्यंतच्या मार्ग निर्मितीचे काम महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे. संगम ब्रिज ते बंडगार्डन या ठिकाणी काम सुरु असून येथे पहिल्या पाईलचे काम नुकतेच पूर्ण करण्यात आले आहे.

शहरात वनाज ते रामवाडी आणि पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट अशा दोन मार्गांचे सध्या काम सुरु आहे. मार्ग क्रमांक एक पिंपरी चिंचवड ते स्वारगेट यामार्गचे पहिल्या टप्यात पिंपरी ते रेंजहिल दरम्यान मार्ग निर्मितीचे काम वेगात सुरु आहे. तसेच रेंजहिल ते स्वारगेट या ५ किमी भुयारी मेट्रो मार्गाची निर्मितीला देखील नुकतीच सुरवात करण्यात अली आहे. मार्ग क्रमांक दोन वनाज ते रामवाडी या मार्गाचे काम वनाज ते शिवाजीनगर पर्यंत जोमाने सुरू असताना आता शिवाजीनगर कोर्टापासून रामवाडीपर्यंतचे कामही महाराष्ट्र मेट्रो रेल कॅार्पोरेशन लिमिटेड (महामेट्रो) कडून सुरू करण्यात आले आहे मंगळवार पेठ ते पुणे मेट्रो स्टेशन या प्रस्तावित मेट्रो स्टेशन दरम्यान पहिला पिअर उभा राहत आहे. या रिच मध्ये युटीलीटी शिफ्टिंगची कार्ये सुरु असून मार्गावर बैरीकेडस लावण्यात येत आहेत. या मार्गावर मोठ्या प्रमाणात संस्था आहेत, जसे; सेंन्ट्रल रेल्वे डीआरएम ऑफीस, हॉटेल्स, इंजिनियरिंग कॉलेज, हॉस्पिटल तसेच बाजारपेठ या भागात मोठ्या प्रमाणात ये- जा करण्याकरिता नागरिकांची सतत राह्दारी सुरु असते या ठिकाणी मेट्रो वाहतूक सुरु झाल्यास नागरिकांना याचा फायदा होणार आहे. शहराला उत्तर पुणे ते दक्षिण पुणेला जोडणारा प्रमुख मार्ग असणार आहे.

या मार्गाचे काम जे.कुमार इन्फ्रा प्रोजेक्टस लिमिटेड या कंपनीला देण्यात आले आहे. पहिल्या टप्यात रिच – ३ चे कार्य आरटीओ कार्यालय ते बंड गार्डन भागात करण्यात येणार असून या ठिकाणी १३३ पिलर उभारले जातील. ३.५ कि.मी. च्या या मेट्रो मार्गावर मंगळवार पेठ,पुणे स्टेशन,रुबी हॉल आणि बंड गार्डन मेट्रो स्थानकांचा समावेश आहे. ही संपूर्ण स्टेशन एलीव्हेटेड राहणार असून पुणे रेल्वे स्टेशन या ठिकाणी मेट्रो प्रवाशांना सरळ रेल्वे पादचारी पुलावर जाता येईल. वाघोली परिसरात १० एकर जागेत या रिच चे कास्टिंग यार्ड निर्माण करण्यात येत असून लवकरच या ठिकाणी गर्डर सेग्मेंट कास्टिंगचे कार्य सुरु करण्यात येणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.