Kondhwa : कोंढव्यात सिक्युरिटी गार्डकडून साफसफाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग

एमपीसी न्यूज : कोंढवा परिसरातील (Kondhwa) एका उच्चभ्रू सोसायटीत साफसफाई करणाऱ्या एका महिलेचा सोसायटीतील सिक्युरिटी गार्डने विनयभंग केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. 32 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. त्यानुसार सिक्युरिटी गार्ड अहमद पाशा इमामुद्दीन पिरजादे (वय 58) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला.

याप्रकरणी अधिक माहिती अशी, की कोंढवा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील एनआयबीएम परिसरात एका उच्चभ्रू सोसायटीत फिर्यादी महिला या काम करतात. तर आरोपी त्याच इमारतीत सुरक्षारक्षक म्हणून काम करतो. गुरुवारी सकाळी फिर्यादी या क्लब हाऊसची साफसफाई करत असताना आरोपीने सफाई करण्याच्या बहाण्याने फिर्यादीच्या पाठीमागून येऊन जबरदस्तीने त्यांना पकडले.

फिर्यादी महिलेने त्याला विरोध केला असता आरोपीने (Kondhwa) त्यांना जवळ ओढून त्यांच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. कोंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

Chikhali : जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ स्कूल अँन्ड ज्युनिअर कॉलेजचे प्रथम स्नेह संमेलन संपन्न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.