Pune : ट्रेकींग पलटणतर्फे सरसगडावर स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज – पुण्यातील ट्रेकींग पलटण गृपतर्फे रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यातील सरसगडावर रविवारी (दि १६) रायगड येथे स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या गृपची ही तीन वर्षातील २२ वी स्वच्छता मोहीम आहे.

अष्टविनायक गणपतींपैकी एक बल्ळालेश्वर गणपती मंदिराच्या जवळच असलेल्या खड्या चढाईचा बेलाग कातळ असलेला सरसगड आहे. साहसी पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बिंदू असलेला हा गड आपल्या खड्या चढाईच्या कोरीव पाय-यांसाठी प्रसिद्ध आहे. रविवारी ट्रेकींग पलटण गृप, पुणेच्या सदस्यांनी पाली गावातून ट्रेकमार्गावर आणि गड तसेच बालेकिल्ला परिसरातील प्लास्टिक कचरा गोळा केला. यात बाटल्या, ग्लास, फूड पँकेट्स, पॉलिथिन बॅग असा पर्यावरणास घातक कचरा उचलून गडाच्या पायथ्याशी दिला.

गडावरील सोसाट्याच्या वा-यामुळे बराच प्लास्टिक कचरा गडावरून घसरून/उडून गडाच्या उतारावर आणि पायथ्याच्या परिसरात पडत होता. याचा अर्थ हा घातक कचरा गडावरील नव्हे तर गडाच्या पायथ्याच्या परिसरातील पर्यावरणाला धोकादायक ठरू शकतो. म्हणून गडाला भेट देणाऱ्यांनी आपला कचरा गडावर न फेकता सोबत घेऊन जावा आणि गडाचे पावित्र्य व स्वच्छता राखण्यासाठी मदत करावी.

या स्वच्छता मोहिमेत ट्रेकींग पलटन गृपचे परशुराम भांगरे, हनुमंत लोंढे, श्रीरंग गोरसे, खंडू दयाळ, हेमंत पाटील, कुमार खुंटे, नितीन बागले, साईनाथ जगदाळे, आकाश शिंदे, सुरज लोंढे, किशोर हांडे, अंकुश धुपाटने, संजय पालकर, डॉ. मिलिंद गायकवाड, प्रा. संदीप चौधरी आणि डॉ. सुरेश इसावे सदस्यांनी सहभाग घेतला. ट्रेकींग पलटन पुणे गृपचे प्रा. डॉ. सुरेश इसावे यांनी या स्वच्छता मोहिमेचे नियोजन केले व प्रा. डॉ. अनिता धायगुडे व प्रा. डॉ. संदीप गाडेकर यांनी मदत केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.