Pimpri : श्री शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठानिमित्त मूर्तीची भव्य मिरवणूक

एमपीसी न्यूज – पिंपरी गावातील श्री शितळादेवी मंदिरातील मूर्ती प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण समारंभ बुधवारी सकाळी सात वाजता करवीर पिठाचे श्रीमद्‌ जगद्‌गुरु शंकराचार्य यांच्या हस्ते होणार आहे. त्यानिमित्त सोमवारी (17 जून) श्री शितळादेवी मूर्तीची व कलशाची भव्य मिरवणूक पिंपरी गावातील तपोवन मंदिरपासून माळी आळी, कापसे आळी, वाघेरे आळी, वाघेरे कॉलनी एक ते चार, न्हावी आळी, सटवाई मंदिर, महालक्ष्मी मंदिर, भैरवनाथ मंदिर या परिसरातून वाजतगाजत काढण्यात आली.

यावेळी निमंत्रक नगरसेवक संदीप वाघेरे, वसंत दत्तोबा नाणेकर, किसन कापसे, चिंधाजी गोलांडेमामा, चंद्रकांत गव्हाणे, माजी नगरसेवक संतोष कुदळे, रामभाऊ कुदळे, हरीश वाघेरे, कैलास वाघेरे, राजेंद्र वाघेरे आदींसह हजारो भक्त भाविक उपस्थित होते.

  • पिंपरी गावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने आयोजित केलेल्या या सोहळ्यात मंगळवारी (18 जून) सकाळी 8.30 वाजता प्रासाद वास्तू मंडल स्थापना, मुख्य देवता स्थापना, कुंड संस्कार, नवग्रह स्थापना, ग्रह होम, वास्तू होम, पर्याय होम, सायंकाळी 5 वाजता सप्तसती पाठ व पूजा मंत्रा पुष्प आणि मुख्य समारंभ बुधवारी (19 जून) सकाळी 7 नंतर स्थापित देवता पूजन, कलश स्थापन, प्रायश्चित होम, मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलाशारोहण समारंभ, पूर्णाहूती, महापूजा, महानैवेद्य व सायंकाळी 5 नंतर महाप्रसाद असे धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असेही आवाहन नगरसेवक संदीप वाघेरे यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.