Dehuroad : घरफोडी करून सव्वा लाखांचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज – कुलूप लावून बंद असलेल्या घरात अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करत एक लाख 19 हजार 800 रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने रोख रक्कम चोरून नेली. ही घटना 10 जून ते 15 जून या कालावधीत गंधर्व नगरी देहुगाव येथे घडली.

अकबर गुलाब जमादार (वय 35) यांनी याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अकबर 10 जून रोजी त्यांच्या कामानिमित्त बाहेरगावी गेले. दरम्यान, त्यांचे घर कुलूप लावून बंद होते. अज्ञात चोरट्यांनी बंद घराचे कुलूप तोडून घरातून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड असा एकूण एक लाख 19 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरून नेला.

15 जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अकबर घरी आले. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तात्काळ देहूरोड पोलिस ठाण्यात धाव घेत गुन्हा नोंदवला. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.