Chinchwad : महाविद्यालयीन विद्यार्थिनी झाली एक दिवसाची पोलीस अधिकारी 

एमपीसी न्यूज – आज जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून चिंचवड पोलीस स्टेशन आणि विमेन हेल्पलाईनच्या वतीने महाविद्यालयीन विद्यार्थिनीचे एका दिवसाची पोलीस अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात आले. तृप्ती निंबळे असे या विद्यार्थीनीचे नाव असून ती कला शाखेच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत आहे. यावेळी पोलीस व्हॅनमधून तिचे चिंचवड पोलीस स्टेशनमध्ये आगमन झाले व पुष्प गुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. 

यावेळी विमेन्स हेल्पलाइनच्या अध्यक्षा नीता परदेशी तसेच चिंचवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत खुळे, बिर्ला हॉस्पिटलच्या डॉ. अन्नपूर्णा कालिया, डॉ. रेश्मा रणसिंग, पोलीस अधिकारी रोहिणी शेवाळे आदी उपस्थित होते.

दिवसेंदिवस महिलांचे अत्याचार वाढत चालले आहेत महिला या महिलांना न्याय देऊ शकतात या धर्तीवर ही संकल्पना राबवण्यात आली होती. तृप्ती निंबळे म्हणाली जास्तीत जास्त महिलांनी प्रशासकीय सेवेमध्ये यायला पाहिजे. एक दिवसीय पोलीस अधिकारी बनविण्याचं स्वप्न पूर्ण झालेली तृप्ती म्हणाते मला खरंखूर पी.एस.आय व्हायचं आहे.

याप्रसंगी विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला. बिर्ला हॉस्पिटल आणि सुखकर्ता लॅब यांच्यावतीने महिला पोलीस कर्मचारी यांच्यासाठी आरोग्य शिबिर व विविध रक्त तपासण्या करण्यात आल्या. विविध क्षेत्रात काम करीत असलेल्या सरिता साने, सुषमा वैद्य, दीपाली येवले, गायत्री ढवळे, जनाबाई काकडे,  पोलीस कर्मचारी रुपाली पुजारी, नीतू चामले या महिलांचा देखील सत्कार करण्यात आला.

यावेळी विमेन हेल्पलाईन संस्थेच्या दीपाली येवले, उज्वला बोभाटे, अश्विनी निसाळ, देवयानी पाटील, सारिका परदेशी करिष्मा कांबळे, लता सोनवणे आणि संस्थेच्या इतर पदाधिका-यांचे सहकार्य लाभले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.