रविवार, सप्टेंबर 25, 2022

Raju Srivastava : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन

41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज

एमपीसी न्यूज : भारतीयांसाठी अतिशय दु:खाची बातमी म्हणजे विनोदवीर राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्यांना 10 ऑगस्ट रोजी जिममध्ये वर्कआउट करताना हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्यांना एम्समध्ये दाखल करण्यात आले होते. गेल्या 41 दिवसांपासून व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देणाऱ्या राजू श्रीवास्तव यांनी आज अखेरचा श्वास घेतला.

केवळ भारतीयच नव्हे तर विश्वात हास्याची ताईत असणाऱ्या राजू श्रीवास्तव यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. सर्वजण जड अंतःकरणाने या हास्यविराला आदरांजली (Raju Srivastava) वाहत आहेत.

spot_img
Latest news
Related news