Raju Srivastava : सर्वांना खळखळून हसवणारा ‘गजोधर’ मात्र दुर्मिळ झाला…

एमपीसी न्यूज : राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) हे नाव ऐकले कि सर्वांच्या ओठावर हसू येते. पण आज तेच नाव ऐकून प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आहे. कारण संपूर्ण आयुष्य या विनोदवीराने आपल्या विनोदाने भारतीयांच्याच नव्हे तर जगाच्या हृदयावर राज्य केले. आज या विनोदवीराने 41 दिवसांची मृत्यूची झुंज अखेर संपवून जगाला शेवटचा निरोप दिला.

या विनोदवीराचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी कानपूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमेशचंद्र श्रीवास्तव आणि आईचे नाव सरस्वती श्रीवास्तव आहे. राजू श्रीवास्तव हे लहानपणापासूनच कॉमिक कलेत समृद्ध आहेत. राजू यांना गजोधर भैया या नावानेही ओळखले जात होते.

सुरुवातीच्या काळात राजू श्रीवास्तव यांना बॉलीवूड चित्रपटांमध्ये छोट्या भूमिकांसाठी काम केले. त्यांनी 1989 मध्ये ‘मैने प्यार किया’ या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर सलमान, शाहरुख खान, अनिल कपूर, गोविंदा, नसरुद्दीन शाह, मिथुन चक्रवर्ती, सनी देओल यांसारख्या बड्या नायकांच्या चित्रपटात काम केले. त्यांची ओळख लोकांसमोर आली, ती 2005 मध्ये! स्टार प्लसवर सुरु झालेला ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज नावाच्या ‘शो’ मधून राजू श्रीवास्तव गजोधर भूमिकेतून समोर आले. आणि एका शोमधून ते भारताच्या कानाकोपऱ्यातून जगभरात प्रसिद्ध झाले.

Raju Srivastava : विनोदवीर राजू श्रीवास्तव यांचे निधन

त्यांची भोजपुरी भाषेतील विनोद शैली लोकांना भुरळ (Raju Srivastava) पाडू लागली. ज्यांनी ज्यांनी रेल्वेचा प्रवास केला त्यांच्या मनावर राजू श्रीवास्तव नाव कायमचे कोरले गेले. तर ज्यांनी रेल्वेचा प्रवास कधी केला नाही अशाना राजू यांनी रेल्वेचा मनमुराद प्रवास घडवला. रेल्वेतील लोकांची गर्दी, स्वभाव, त्यातून जोपासला जाणारा भाव, गरिबी राजू हे काही मिनिटांतच लोकांना दाखवून देत.

कोणत्याही क्षणी ते व्यासपीठावर अतिशय उत्साहात प्रवेश करत. तर त्याचा शेवट देखील तितक्याच उत्साहात असत. त्यांचे प्रसिद्ध वाक्य म्हणजे ”जिंदगी मे ऐसा काम करो, कि लोग कहे भाई तू रेहन दे”… असे म्हणत आयुष्यात सर्वांना खळखळून हसवणारा गजोधर मात्र दुर्मिळ झाला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.