Bhosari : भोसरी एमआयडीसी येथे कंपनीच्या ऑफीसला आग, कागदपत्रे जळून खाक

एमपीसी न्यूज – भोसरी एमआयडीसी (Bhosari) येथील सेक्टर, फ्लॉब इलेक्ट्रिकल, भोसरी MIDC यांच्या ऑफिसमध्ये आज (शनिवारी) सकाळी सातच्या सुमारास आग लागली. आगीची वर्दी मिळताच तीन अग्निशमनच्या गाड्या दाखल झाल्या होत्या.

यावेळी घटनास्थळी पिंपरी (मुख्य अग्निशामक केंद्र) वॉटर टेंडर , भोसरी उप – अग्निशामक केंद्र, चिखली उप – अग्निशामक केंद्र या तीन गाड्या घटनास्थळी पोहचल्या. आगीचे स्वरूप मोठ् होते. तब्बल 23 कर्मचाऱ्यांनी दिड तासात ही आग विझवली आहे.

Pune : आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाच्या आनंदात IUCAAच्या शास्त्रज्ञांनी मिठाई वाटून साजरा केला जल्लोष

आगीत संपूर्ण कार्यालय जळून खाक झाले आहे. ही (Bhosari) आग शॉर्टसर्कीटमुळे लागल्याचा अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणती ही जिवीतहानी झालेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.