Pune : आदित्य-L1 च्या यशस्वी प्रक्षेपणाच्या आनंदात IUCAAच्या शास्त्रज्ञांनी मिठाई वाटून साजरा केला जल्लोष

एमपीसी न्यूज : भारताने शनिवारी (Pune) आपली पहिली अंतराळ-आधारित सौर निरीक्षण मोहीम आदित्य-L1 यशस्वीरित्या प्रक्षेपित केली. यानिमित्ताने पुण्यातील इंटर-युनिव्हर्सिटी सेंटर फॉर अॅस्ट्रॉनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिक्स (IUCAA) मधील शास्त्रज्ञांमध्ये  उत्साहाचे  वातावरण पसरले. तिरंगा ध्वज फडकवत, या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी शालेय आणि विद्यापीठातील विद्यार्थी, हौशी खगोलशास्त्रज्ञ आणि IUCAA सदस्य अशा 300 जणांनी IUCAAच्या कॅम्पसमध्ये जमून आनंद साजरा केला. यावेळी आदित्य एल 1 उपग्रह पीएसएलव्ही रॉकेटच्या वरच्या टप्प्यापासून वेगळा झाल्यावर मोठ्या जल्लोषात मिठाईचे वाटपही करण्यात आले.

IUCAA मधील शास्त्रज्ञांनी सोलर अल्ट्राव्हायोलेट इमेजिंग टेलिस्कोप (SUIT) विकसित करण्यासाठी जवळजवळ एक दशक अथक परिश्रम घेतले आहेत. आदित्य-L1 मोहिमेतील मुख्य पेलोड्सपैकी एक आहे.

प्रक्षेपणानंतर लगेचच, IUCAA चे संचालक प्रो. आर. श्रीआनंद यांनी इंडियन एक्सप्रेसला प्रतिक्रिया देताना म्हंटले आहे, की आदित्य-L1चे प्रक्षेपण त्यांच्यासाठी आनंददायी होता. एकदा का L1 पॉईंटवर गेले की मग महत्त्वाचे काम सुरू होईल.  SUIT विकसित करणाऱ्या दुर्गेश त्रिपाठी आणि ए एन रामप्रकाश यांच्या नेतृत्वाखालील शास्त्रज्ञांच्या टीमचे त्यांनी कौतुक केले.

Pune : आग्र्यावरून सुटका घटनेच्या 356 व्या वर्षा निमित्त पुणे ते शिवनेरी सायकल राईड; 575 सायकल स्वारांचा सहभाग

श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ (Pune) केंद्रातून सकाळी 11.50 वाजता आदित्य-एल1 उपग्रह घेऊन जाणाऱ्या PSLV रॉकेटसाठी स्टेज तयार करण्यात आला होता. IUCAA ने मिशनमध्ये सहभागी असलेल्या आपल्या शास्त्रज्ञांद्वारे सकाळी 10.15 वाजता प्रक्षेपणपूर्व चर्चा आणि प्रात्यक्षिके आयोजित केली. हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला होता. संस्थेच्या यूट्यूब चॅनेल IUCAA Scipop वर थेट प्रक्षेपणही करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.