Pune : आग्र्यावरून सुटका घटनेच्या 356 व्या वर्षा निमित्त पुणे ते शिवनेरी सायकल राईड; 575 सायकल स्वारांचा सहभाग

एमपीसी न्यूज – छत्रपती शिवाजी महाराजांची झालेल्या (Pune) आग्र्याहून सुटकेला यंदा 365 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षी इंडो अथलेटिक्स सोसायटीतर्फे पुणे – शिवनेरी – पुणे अशा 200 किमी सायकल राईडचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 365 व्या वर्षानंतर 575 सायकल स्वारांनी यामध्ये सहभाग घेतला.

सदर वर्ष पुणे ते शिवनेरी या राईडचे चौथे वर्ष आहे. पर्यावरण आणि आरोग्य याचा संदेश समाजामध्ये देत सदर सायकल स्वारी मार्गक्रमण करते. एका दिवसामध्ये तब्बल 100 किलोमीटर अंतर पाच ते सहा तासांमध्ये पार केले. शनिवार (दि.2) मोशी येथील गोडाऊन चौक येथून सकाळी सहा वाजता सदर सायकल राईडला झेंडा दाखवून सुरुवात झाली.

यावेळी आयएएसचे अजित पाटील, गणेश भुजबळ उपस्थित होते. आग्र्याहून सुटका या ऐतिहासिक प्रसंगाला इतिहासात अतिशय महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराज आग्रा येथून 17 ऑगस्ट 1666 साली सुटले होते.

या घटनेला यावर्षी 356 वर्ष पूर्ण झाली. ते आग्रा येथून निघून मथुरा, प्रयागराज, वाराणसी, गया, कटक, हैदराबाद, मलखेड, विजयपूर, गोकर्ण, पन्हाळा आणि राजगड किल्ला असे तेराशे किलोमीटर अंतर तेरा दिवसांमध्ये पार करुन राजगडावर 30 ऑगस्ट रोजी पोचले होते. याच महाराजांच्या पराक्रमाला मानवंदना देण्यासाठी आम्ही दरवर्षी पुणे ते शिवनेरी राईड आयोजित करतो असे आयएएसचे सदस्य गजानन खैरे यांच्यातर्फे सांगण्यात आले.

Pimpri : ॲड. राहुल चव्हाण यांची चिंबळी गावच्या उपसरपंच पदी निवड

पुणे ते शिवनेरी सायकल मार्ग – नाशिक फाटा – राजगुरुनगर – मंचर – नारायणगाव – शिवनेरी. असा होता. अष्टविनायका मधील लेण्याद्री करून सर्व साईकलिस्ट ओझर येथे मुक्कामसाठी गेले आणि दुसऱ्या दिवशी याच मार्गावरून (Pune) परतीचा प्रवास संपन्न झाला. असे आयएएस शिवनेरी सायकल राईडचे प्रमुख मदन शिंदे, दादासाहेब नखाते, प्रशांत तायडे आणि अविनाश चौगुले यांच्या तर्फे सांगण्यात आले.

नियोजनामध्ये गिरीराज उमरीकर, अमित पवार, रमेश माने, सुशील मोरे, श्रीकांत चौधरी, मारुती विधाते, प्रतीक पवार, सुशील मोरे, श्रेयस पाटील, अजित गोरे,अमित पवार, अविनाश अनुशे, प्रणय कडू, श्रीकांत चौधरी, प्रदीप टाके, प्रतीक पवार, कैलास शेट तापकीर, प्रकाश कांबळे आदींनी महत्त्वाची भूमिका बजावली.

राजगुरुनगर येथे हुतात्मा राजगुरु सायकल क्लब, नारायणगाव येथे साई संस्थान व शिवनेरी ॲथलेटिक असोसिएशन तर्फे स्वागत करण्यात आले. श्रीराज हॉटेल तर्फे सर्वांना मसाला दूध वाटप करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.