Pimpri : ॲड. राहुल चव्हाण यांची चिंबळी गावच्या उपसरपंच पदी निवड

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे (Pimpri) सभासद ॲड. राहुल बबन चव्हाण यांची चिंबळी या गावच्या उपसरपंच पदी निवड झाली. याबद्दल पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशन व पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् सोसायटी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनचे माजी अध्यक्ष ॲड. संजय दातीर पाटील, सोसायटीचे अध्यक्ष ॲड. दिनकर बारणे, ॲड. अतिश लांडगे, ॲड. प्रसन्न लोखंडे, ॲड. रिना मगदूम, ॲड. प्रशांत भडकुंभे, ॲड. अनिल डांगे, ॲड. अनिल सेजवणी, ॲड. बालाजी पवार, ॲड. बबन बवले, ॲड. धनंजय कोकणे, ॲड. मंगेश खराबे, ॲड. अभिनव भटेवरा, पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे, ऑडीटर ॲड. राजेश रणपिसे, ॲड. मोहित पिरंगुटे, सभासद प्रशांत बचुटे उपस्थित होते.

Talegaon Dabhade : युवा उद्योजक रणजीत काकडे यांना ‘उद्धव श्री’ पुरस्कार प्रदान

ॲड. राहुल चव्हाण यांनी आपल्या सुरवातीच्या काळात केलेल्या (Pimpri) वकिली प्रॅक्टिसचा ग्रामपंचायत मध्ये काम करताना निश्चितच उपयोग होत आहे. पुढील काळात गावाच्या सर्वांगीण विकासासाठी उपयोग करून सामान्य माणसाचे न्याय हक्काचे प्रश्न सोडविणार असल्याचे त्यांनी सांगितले. ॲड. प्रशांत बचुटे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.