Pune: भगिनी निवेदिता प्रतिष्ठानतर्फे पुरस्कार वितरण

एमपीसी न्यूज – गेली ४० वर्षे महिला व बाल कल्याणाचा वसा घेतलेल्या  भगिनी निवेदिता प्रतिष्ठान, पुणे या संस्थेचा विविध पुरस्कार वितरण समारंभ शुक्रवार (दि.14) पुण्यातील नवी पेठ येथील निवारा सभागृहात संपन्न झाला.
अनाथ भिक्षेक-यांवर विनामूल्य उपचार करणाऱ्या डॉ मनीषा व डॉ अभिजित सोनवणे यांना ‘सरस्वती समाजसेवा पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. भिक्षेक-यांना भीक न देता छोटे मोठे काम देऊन स्वत:च्यापायावर उभे करायला मदत करा अशी कळकळीची विनंती डॉ अभिजित यांनी केली.
वंचित समाजाला मदतीचा हात देणाऱ्या  आर्टिस्ट्री या संस्थेच्या संस्थापिका श्रीमती वीणा गोखले यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
_MPC_DIR_MPU_II
समुपदेशक श्रीमती नंदिनी जाधव यांना संस्थेतर्फे गौरवपत्र देण्यात आले.
उत्तम चाललेला ब्युटी पार्लरचा व्यवसाय सोडून देवाच्या नावाखाली ‘जट’ आलेल्या, समाजाकडून अन्याय होत असलेल्या स्त्रियांना ‘जट मुक्त’ करून पुनर्प्रस्थापित करण्याचे काम त्या करीत आहेत.दर वर्षीप्रमाणे  संस्थेतर्फे शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा  घेऊन, पारितोषिक प्राप्त विद्यार्थ्यांना त्यांचे विचार व्यासपीठावर मांडण्याची संधी या वेळी दिली.
अध्यक्ष डॉ सुलभा देऊस्कर यांनी प्रास्ताविक तर उपाध्यक्ष ऋजुता पितळे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता दामले यांनी केले. वंदना केळकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे संयोजन सह सचिव प्रणोती गर्गे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1