Vadgaon Maval : महाराष्ट्र बंदला मावळ मध्ये संमिश्र प्रतिसाद

एमपीसी न्यूज – लखीमपुर येथे शेतकऱ्यांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडी मधील घटकपक्षांनी महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. सोमवारी (दि. 11) झालेल्या या महाराष्ट्र बंदला मावळ तालुक्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वडगाव शहरात व्यापाऱ्यांनी दुकाने व सर्व व्यवहार दुपारपर्यंत बंद ठेवले होते.

यावेळी मावळचे आमदार सुनिल शेळके, माऊली दाभाडे, चद्रकांत सातकर, बबनराव भेगडे, बाबुराव वायकर, सुवर्णा राऊत, राजेश खांडभोर, बाळासाहेब ढोरे, विठ्ठल शिंदे, सचिन घोटकुले, सुभाष जाधव, सुनिल दाभाडे, अनिल ओव्हाळ, नारायण ठाकर, सोनी गिल, उमा शेळके, आरती घारे, हेमा रेड्डी, शबनम खान, काळुराम मालपोटे, बाळासाहेब शिंदे, प्रकाश आगळमे, विजय सातकर, संभाजी राक्षे, अतुल राऊत, सोमनाथ धोगंडे, दत्तात्रय पडवळ, अंकुश आंबेकर, दिलीप ढमाले तसेच मावळ तालुक्यातील महाविकास आघाडीचे आजी-माजी, ज्येष्ठ पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

वडगाव शहरातून महाविकास आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रॅली काढून या हल्ल्यातील दोषींवर कडक कारवाई व्हावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना दिले.

लखीमपुर घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरात उमटू लागले असून या घटनेचा निषेध करण्यासाठी महाविकास आघाडीने राज्यव्यापी बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकार आंदोलक शेतकऱ्यांशी क्रूरपणे वागत असून मागील सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे सुरू असलेले आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारचा खरा चेहरा दिसला असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.