Maval : वाहनगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तरुणांकडून संगणक भेट

एमपीसी न्यूज – वाहनगाव येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला तरुणांकडून संगणक भेट देण्यात आले. यामुळे आदिवासी दुर्गम भागातील देखील मुले संगणक साक्षर होणार आहेत. वाहनगाव मधील प्राथमिक शाळेतील विद्यार्थी पाठ्यपुस्तकासह संगणकाद्वारेही शिकणार आहेत.
सोमनाथ माने, गणेश चव्हाण, अतुल यादव, संजीव येलगे, श्रीनिवास कांबळे, प्रताप चिल्लाळ या तरूण मित्रांच्या आर्थिक मदतीने हा उपक्रम राबविण्यात आला. संगणक अभियंता असलेल्या अतुल यादव याने त्याच्याकडील असलेल्या अनुभवाचा आणि अभ्यासाचा उपयोग करून विद्यार्थ्यांसाठी एक मार्गदर्शिका पुस्तिका तयार केली आहे, त्याचा या सर्व विद्यार्थ्यांना फायदा होणार आहे.

शिक्षिका वनिता रजपूत म्हणाल्या, “असा स्तुत्य उपक्रम प्राथमिक शाळेत प्रथमच होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी देखील हुशार आहेत. भौतिक सुविधेसह आधुनिक तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर या शाळेतील विद्यार्थी पुढे जातील.”

शाळेतील विद्यार्थिनी अंजली वाडेकर म्हणाली, “या संगणकाचा आम्हाला उपयोग  होईल. वही पेनाने आम्ही अभ्यास करतो. यापुढे संगणक शिकायला मिळेल. त्यातून देखील अभ्यास करता येईल.”

बळीराम वाडेकर यांनी प्रास्ताविक केले. वनिता रजपूत यांनी सूत्रसंचालन केले. सविता खेडेकर यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.