Pune Crime News : पाचव्या मजल्यावरून खाली कोसळल्याने बांधकाम कामगाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – पाचव्या मजल्यावर डकच्या जाळीमध्ये पडलेले हेल्मेट काढण्यासाठी जाणाऱ्या कामगाराचा पाचव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झालाय. 29 जून रोजी मुंडवा येथील व्यंकटेश ग्राफिटी ग्लोवर या इमारतीच्या बांधकाम दरम्यान ही घटना घडली. हर्षित बिश्वास असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव आहे. मुंढवा पोलीस ठाण्यात (Pune Crime News)  याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व्यंकटेश ग्राफिटी ग्लोवर साईटचे बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत व्यक्तीची पत्नी शांपा हर्षित बिश्वास यांनी याप्रकरणी तक्रार दिली आहे. 

Pimpri News:  अतिसार रुग्णांचे उपचार, दक्षतेबाबत  नियंत्रण पंधरवडा

 

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, व्यंकटेश ग्राफिटी ग्लोवर या बांधकाम साइटवर फिर्यादीचे पती काम करत होते. यावेळी काम करत असताना त्यांच्या डोक्यातील हेल्मेट पाचव्या मजल्यावरील डकमधील सुरक्षा जाळीवर पडले. ते हेल्मेट काढण्यासाठी त्यांनी जाळीवर पाय ठेवला असता नायलॉनची जाळीची रशी तुटली आणि ते पाचव्या मजल्यावरून खाली पसरत पडले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
संबंधित बिल्डर आणि कॉन्ट्रॅक्टरने जिन्याला पूर्ण सुरक्षा कवच न लावल्यामुळेच फिर्यादी यांच्या पतीचा पाचव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला. मुंढवा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.