Illegal liquor Transport: पुष्पा स्टाईलने अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींना अटक

एमपीसी न्यूज:  पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. (Illegal Liquor Transport) त्यांच्याकडून सुमारे 60 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या आरोपींविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

गोवा राज्य निर्मित व फक्त गोवा राज्यात विक्रीकरिता असलेल्या विदेशी दारूची पुष्पा चित्रपटातील स्टाईलने अवैधरित्या वाहतूक या आरोपींमार्फत करण्यात आली. निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, तळेगाव विभाग, पुणे या कार्यालयाच्या पथकामार्फत 6 जुलैला ही कारवाई करण्यात आली.  मुंबई- बंगलोर एनएच- 4 महामार्गावर वळवण गावच्या हद्दीतून जाणाऱ्या जुन्या पुणे- मुंबई महामार्गावरील लोणावळ्यातून जाणाऱ्या बाह्य रस्त्याच्या बाजूला लोणावळा पुणे या परिसरात सापळा लावण्यात आला होता. या कारवाईत टाटा कंपनीचा एक एल पी टी 2515 प्रकारचा 10 चाकी ट्रक जप्त करून करण्यात आला.

 

NCP : राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिंचवड विधानसभा कार्याध्यक्षपदी अरुण पवार यांची  नियुक्ती

 

ट्रकची तपासणी करताना त्यामध्ये महाराष्ट्र दारू बंदी कायदा 1949अंतर्गत गुन्ह्यातील मुद्देमाल मिळाला. गोवा राज्यात विक्री करता निर्मित असलेले विदेशी मद्य व महाराष्ट्र राज्यात विक्रीस प्रतिबंध असलेल्या रॉयल चॅलेन्ज प्रीमियम 750 मिली क्षमतेच्या प्रति बॉक्स 12 बाटली याप्रमाणे 48 बॉक्स मधील 576 सीलबंद काचेच्या बाटली रुपये 320/- एमआरपी असे असलेल्या मिळाल्या आहेत. (Illegal Liquor transport) तसेच मॅक डोवेल नं 1 व्हिस्की 750 मिल क्षमतेच्या प्रति बॉक्स 12 बॉटल याप्रमाने 447 बॉक्स मधील 5,364 सीलबंद काचेच्या बॉटल त्यावर 270 रुपये एमआरपी असा उल्लेख असलेल्या मिळालेल्या आहेत. टुबर्ग प्रीमिअर बिअर चे 42 बॉक्स मध्ये 1008 सीलबंद कॅन, रोख रक्कम, मोबाईल फोन, दोन निळ्या रंगाच्या ताडपत्री असे एकूण 59,09,140 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

 

 

बाबुलाल मेवाडा, वय 52 वर्षे, रा. राजस्थान व संपतलाल मेवाडा, वय 30 वर्षे यांना अटक करण्यात आले आहे. इतर संशयित आरोपींना फरार घोषित केले आहे. सर्व आरोपींच्याविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायदा 1949 चे कलम 65(ए )(ई), 81, 83 व 90 अन्वये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

कांतीलाल उमाप, आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई, सुनिल चव्हाण, संचालक, दक्षता व
अंमलबजावणी, राज्य उत्पादन शुल्क, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या आदेशानुसार ए. बी चासकर, विभागीय उपायुक्त, राज्य उत्पादन शुल्क, पुणे विभाग, सी बी राजपूत, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे, एस आर पाटील, उप-अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, पुणे, युवराज शिंदे, उप- अधीक्षक, पिंपरी चिंचवड,राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली व राज्य उत्पादन शुल्क, पुणे यांना मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे संबधित कारवाई करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.