Shinzo Abe Dies : भारताने जवळचा मित्र गमावला – पंतप्रधान नरेंद्र मोदी

एमपीसी न्यूज : भारताचे जवळचे मित्र (Shinzo Abe Dies) असलेले जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांची हत्या करण्यात आली. त्यात त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने भारताने जवळचा मित्र गमावला अशी प्रतिक्रिया भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, कि माझ्या सर्वात प्रिय मित्रांपैकी एक शिंजो आबे होते. त्यांच्या दुःखद निधनाने मला धक्का बसला आहे. भारत-जपान संबंधांना विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीच्या पातळीवर नेण्यात त्यांनी मोठे योगदान दिले. आज संपूर्ण भारत जपानसोबत शोक व्यक्त करत आहे आणि या कठीण क्षणी आम्ही आमच्या जपानी बंधू-भगिनींसोबत एकजुटीने उभे आहोत.

Pune Crime News : बिश्नोईच्या मदतीने संतोष जाधवने मध्यप्रदेशातून 15 पिस्तूल आणले

शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला – Shinzo Abe Dies

आज सकाळी शिंजो आबे यांच्यावर प्राणघातक हल्ला झाला, हल्ल्यानंतर आबे यांना रुग्णालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला, मात्र त्यांचा जीव वाचवण्यात त्यांना यश आले नाही. कार्यक्रमात भाषण करताना त्यांच्यावर दोन गोळ्या झाडण्यात आल्या. NHK च्या वृत्तानुसार, आरोपीने 2005 पर्यंत सागरी सेल्फ डिफेन्स फोर्समध्ये काम केले आहे. पोलिसांचे म्हणणे आहे, की आरोपीने तपासकर्त्यांना सांगितले की तो माजी पंतप्रधानांवर असमाधानी होता. त्यामुळे त्याने हा हल्ला केला.

भारताचा एकदिवसीय शोक –

शिंजो आबे यांच्या निधनाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 जुलै रोजी आबे यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय शोक दिवस घोषित केला आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.