Pune Crime News : बिश्नोईच्या मदतीने संतोष जाधवने मध्यप्रदेशातून 15 पिस्तूल आणले

एमपीसी न्यूज – प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला खून प्रकरणातील संशयित आरोपी संतोष जाधव सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. दररोज त्याचे नवनवीन कारनामे उघड होत आहेत. संतोष जाधव  (Pune Crime News) याच्या साथीदारांनी त्याच्या सांगण्यावरून मध्य प्रदेशातून 15 पिस्तूल आणल्याचे उघड झाले आहे. हे पिस्तूल आणण्यासाठी त्याला फरार आरोपी ज्याक उर्फ अमित पंडित व हनुमान उर्फ सचिन बिश्नोई यांनी मदत केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

संतोष जाधव सध्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या कोठडीत आहे. पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्याला गुरुवारी विशेष न्यायालयात हजर करण्यात आले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

 

 

मंचर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका खंडणीच्या गुन्ह्यात सध्या संतोष जाधव (Pune Crime News) अटकेत आहे. या पुण्यातील फिर्यादीकडे त्यांनी 50 हजार रुपये खंडणी मागितली होती. साथीदार नहार थोरात आणि जाधव याला खंडणी मागण्यासाठी पाठवले होते. तसेच संतोष जाधव यांच्या सांगण्यावरून जयेश रतिलाम बहिरम व गणेश तारू यांनी मध्य प्रदेशातून 15 पिस्तूल आणली होती.

 

Vasant More : वसंत मोरे यांचे आता शिंदे सरकारला चॅलेंज, म्हणाले हिम्मत असेल तर…

 

 

संतोष जाधव हा बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याने त्याने या टोळीशी संबंधित काही गुन्हे केले आहेत का? पुणे ग्रामीण आणि इतर जिल्ह्यात त्यांनी आणखी काही गुन्हे केले आहेत का याचा तपास पोलिसांना करायचा आहे. त्यासाठी पोलिसांनी पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद कोर्टात केला होता. त्यानुसार न्यायालयाने जाधवच्या पोलीस कोठडीत 14 दिवसांची वाढ केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.