Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

एमपीसी न्यूज – अल्पवयीन मुलीशी मैत्रीकरून तिला लग्न करण्याचे आमिष दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. धक्कादायक म्हणजे, तरुणाला (Pune Crime News) त्याच्या आई – वडिलांचीही साथ असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. 

 

 

 

पोलीसांनी आई – वडिलांसह मुलावर गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी पिडीत अल्पवयीन मुलीने चंदननगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार, सौरभ गायकवाड (वय 18) आणि त्याच्या आई – वडिलांवर गुन्हा नोंद केला आहे. 2019 ते जुलै 2022 या कालावधीत हा प्रकार घडला आहे.

Pavana Dam: पवना धरण परिसरात 24 तासात 76 मिली मीटर पाऊस

 

 

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांची ओळख झाल्यानंतर त्यांच्यात मैत्रीचे नाते निर्माण झाले. त्यानंतर आरोपीने तक्रारदार मुलगी अल्पवयीन असल्याचे माहिती असताना देखील तिला लग्न  (Pune Crime News) करण्याचे आमिष दाखविले. तिला मी तुझ्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगत तिच्यावर  लैंगिक अत्याचार केले. दरम्यान, यासर्व घटनेला त्याच्या आई- वडिलांची देखील साथ असल्याचे तक्रारीत म्हटेल आहे. त्यानुसार पोलीसांनी त्यांच्यावर गुन्हा नोंद केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.