Pavana Dam: पवना धरण परिसरात 24 तासात 76 मिली मीटर पाऊस

एमपीसी न्यूज – पिंपरी – चिंचवडसह मावळवासीयांची तहान भागविणा-या पवना धरण परिसरात पावसाचा जोर वाढला आहे. मागील चोवीस तासात 76 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील (Pavana Dam)  पाणीसाठा 2.73 टक्क्यांनी वाढला आहे.

पिंपरी – चिंचवडसह मावळ भागातील विविध गावांचा पाण्याचा मुख्य स्रोत  पवना धरण आहे. महापालिका सध्या धरणातून 510 एमएलडी पाणी उचलते. शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी पवना नदीवरील रावेत – पुनावळे दरम्यान असलेल्या बंधा-यातून अशुद्ध जलउपसा करण्यात येतो. सेक्टर 23 निगडी येथे पाणी शुद्ध करुन शहरवासीयांना पुरवठा केला जातो.

 

 

 

 

 

 

 

पवना धरणातील परिस्थिती!

* गेल्या 24 तासात झालेला पाऊस = 76 मि.मि.*

* 1 जूनपासून झालेला पाऊस = 468 मि.मि.*

* गेल्या वर्षी आजच्या तारखे पर्यंत झालेला एकूण पाऊस = 545 मि.मि.

* धरणातील सध्याचा पाणीसाठा = 22.18 टक्के

* गेल्या वर्षी आजच्या तारखेचा धरणातील पाणीसाठा = 34.11 टक्के

* गेल्या 24 तासात पाणीसाठ्यात झालेली वाढ
= 2.73 टक्के

* 1 जूनपासून पाणीसाठ्यात झालेली वाढ = 5.33 टक्के

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.