Maharashtra Rain : राज्यात पुढचे चार ते पाच दिवस अतिमुसळधार पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – राज्यात पुढील चार ते पाच दिवस कोकण, मध्य महाराष्ट्राच्या काही भागात अतिवृष्टीची शक्याता आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर येथे शुक्रवारी रेड अलर्ट आहे. मराठवाड्यात मध्यम ते जोरदार पाऊस पडू शकतो.विदर्भात चांगला पाऊस (Maharashtra Rain) पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे.

 

 

गेल्या तीन दिवसांपासून राज्याच्या विविध भागात पावसांन धुमाकुळ घातला आहे. आता याचं पावसांन मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्याला आपल्या कवेत घेतले आहे. राज्यातल्या सात जिल्ह्यांमध्ये कालपासून तीन दिवस रेड अलर्ट दिला आहे. कोकणासह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी अतिवृष्टीचा (Maharashtra Rain) इशारा हवामान विभागांन दिला आहे. मुसळधार ते अति मुसळधार पाऊस बरसणार होणार असल्याने प्रशासन देखील सतर्क झाले आहे. नदीकाठच्या नागरिकांनाही सावधगिरीचा इशारा देण्यात आला आहे.

 

मुंबईत रेड अलर्टच्या दिवशी समुद्रावर जाण्यास बंदी

 

यंदाच्या मान्सूनमध्ये समुद्रात बुडुन 10 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे प्रशासनाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. रेड आणि आरेंज अलर्टच्या दिवशी सकाळी 6 ते 10 या वेळेतच समुद्रकिनारी जाण्यास परवानगी दिली आहे. त्यानंतर बीचवर जाऊ नये अशी सूचना महापालिकेने दिली आहे. अलर्टच्या पार्श्वभूमीवर प्रशासनांन समुद्रकिनारी लाइफगार्ड,स्पीड बोट, अग्निशमन दलाच्या संरक्षक यंत्रणा सज्ज ठेवल्या आहेत.

 

 

 

अतिवृष्टीचा इशारा

मुंबईसह आसपासच्या जिल्ह्यांमध्ये ठाणे,पालघर, नवी मुंबई, रायगड येथे देखील पाऊस मोठ्या प्रमाणात होत आहे. हवामान विभागाकडून कोकण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुढील तीन दिवसांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे. मुंबईसह, ठाणे, पालघर,नाशिक, पुण्यात आरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे आज दिवसभरातील परिस्थिती पाहता नागरिकांनी काळजी घ्यावी,असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.

 

परशुराम घाट 9 जुलैपर्यंत बंद 

मुंबई – गोवा महामार्गाने कोकणात जाताना लागणारा चिपळूणमधील परशुराम घाट वाहतुकीसाठी 9 जुलैपर्यंत बंद करण्यात आला आहे. घाटात दरडी कोसळण्याची शक्यता आहे,त्यामुळे हा घाट बंद करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.