Vasant More : वसंत मोरे यांचे आता शिंदे सरकारला चॅलेंज, म्हणाले हिम्मत असेल तर…

एमपीसी न्यूज – मनसेचे नेते वसंत मोरे यांनी एक ट्विट करून आता फडणवीस आणि शिंदे सरकारला चॅलेंज दिले आहे. हिम्मत असेल तर महापौरसुद्धा जनतेतून निवडा असं त्यांनी चॅलेंज दिला आहे. तुम्ही कितीही ताकद लावा पुण्याचा महापौर फक्त मनसेचाच होणार असं देखील ते म्हणालेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याची धुरा हाती घेतल्यानंतर पहिलाच निर्णय त्यांनी आरे कारशेड संदर्भात घेतला. त्यामुळे ठाकरे सरकारने घेतलेले सर्वच निर्णय मोडीत निघणार का अशी चर्चा होत असतानाच वसंत मोरे (Vasant More) यांनी केलेले हे ट्विट आता चर्चेत आहे. 

 

वसंत मोरेंनी ट्विट करताना म्हटलं आहे की, आता असे ऐकतोय प्रभाग रचना ही बदलणार आहात आणि म्हणे सरपंच आणि नगराध्यक्ष नागरीकांमधून निवडून देणार. माझे सरकारला एक आव्हान आहे हिम्मत असेल तर महापौरसुद्धा जनतेतून निवडा. शिंदे आणि फडणवीस सरकारला दिले आहे. तसेच आजच सांगतो किती पण ताकद लावा पुण्याचा महापौर हा मनसेचाच असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

 

 

 

देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामपंचायतमधील नगराध्यक्ष, सरपंच थेट जनतेतून निवडून यावेत याबाबत निर्णय घेतला होता. परंतु महाविकास आघाडी सरकारने हा निर्णय बदलला होता. त्यानंतर आता येत्या विधिमंडळ अधिवेशनात महाविकास आघाडीचा निर्णय बदलून सरपंच व नगराध्यक्ष थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी देखील होत आहे. त्यानंतर आता मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी देखील ट्विट करून नवीन सरकारला हे आव्हान दिले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.