Pune Crime News : दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून त्या तरुणाचा खून, चौघे अटकेत

एमपीसी न्यूज – पुण्यातील विश्रांतवाडी परिसरात तुषार जयवंत भोसले या 24 वर्षे तरुणाचा धारदार शस्त्राचे वार करून खून करण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. दुचाकीला (Pune Crime News)  कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर आरोपींनी त्याचा खून केल्याचे समोर आले आहे. 

 

 

बाळू अर्जुन शिंदे (वय 48), फ्रान्सिस स्वामी उर्फ भैया अँथोनी स्वामी (वय 20), अकबर शहाबुद्दीन शेख (वय 22) आणि सरफराज सलीम शेख उर्फ गोल्या (वय 20) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल आहे.

 

 

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीला कट मारल्यावर आरोपी आणि मयत यांच्यात भांडण झाले होते. मयत तुषार भोसले आणि आरोपी भैय्या स्वामी यांच्यात दुचाकीला कट मारल्याच्या रागातून ही भांडण झाली होती. त्याच कारणावरून बुधवारी पुन्हा एकदा दोघात भांडण झाले. यावेळी दोघांनीही एकमेकांना ठार (Pune Crime News) मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. त्यानंतर तुषार भोसले यांनी जनता वसाहत व विश्रांतवाडी येथील मित्रांना बोलावून घेतले आणि भैया स्वामीचा विश्रांतवाडी आणि वडार वस्तीमध्ये शोध घेऊ लागला.

 

 

शोध घेत असताना ते आरोपी बाळू शिंदे यांच्या घरात घुसले आणि त्यांनी शिंदे यांनाच जबर मारहाण केली. याच रागातून शिंदे आणि त्याच्या घराजवळ जमलेल्या सर्फराज आणि अकबर या आरोपींनी हत्यारे घेऊन भोसले आणि त्यांच्या मित्रांचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपींनी भोसलेला पकडून त्याच्यावर चाकूने वार केले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने तुषार भोसले याचा मृत्यू झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.