Trupti Desai :”काली” डॉक्युमेंट्रीच्या निर्मात्यांवर आणि टीमवर कारवाई करा – तृप्ती देसाई

एमपीसी न्यूज – सध्या देशात गाजत काली या डॉक्युमेंट्रीच्या पोस्टरचा वाद मोठ्या प्रमाणात वाढलेला दिसत आहे. त्यातच आता तृप्ती देसाई (Trupti Desai)  यांनी काली चित्रपटाच्या निर्मात्यांवर आणि त्यांच्या टिमवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.

 

Pune Crime News : बिश्नोईच्या मदतीने संतोष जाधवने मध्यप्रदेशातून 15 पिस्तूल आणले

काली या चित्रपटाची निर्माती लीना मणिमेकलई यांनी काही दिवसांपूर्वी एक पोस्टर पोस्ट केले होते. ज्यात आई काली सिगारेट ओढताना दाखवण्यात आली होती. तर आईच्या दुसऱ्या (Trupti Desai)  हातात एलजीबीटी समुदायाचा ध्वजही दिसतो. यावरूनच देशात राजकारण तापलेल दिसत आहे.

 

Pune Crime News : लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार

 

याचा विरोध लक्षात घेता ट्विटरने देखील ही पोस्ट आता हटवली आहे. त्यातच आता तृप्ती देसाई यांनी एलजीबीटी समुदायाचा जो ध्वज देण्यात आला आहे त्याला आमचा विरोध बिलकुल नाही कारण त्या समाजाला मान देणं गरजेचं आहे. परंतु काली मातेच्या हातात सिगारेट देणं हे लाखो भक्तांच्या भावनांशी खेळण आहे, असं सांगतच त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणीसुद्धा तृप्ती देसाई यांनी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.