Pune Crime News : गावठी दारु तयार करणारे दोघे अटकेत

एमपीसी न्यूज – गावठी, देशी दारुचा कारखाना चालविणार्या दोन जणांना (Pune Crime News) अटक करण्यात आली आहे. आढले गावात या दोन जणांना अटक केली आहे. अंकुश वाघमारे (रा. आढले बुद्रुक ता.मावळ) व संतोष कोळी (वय 40, रा. आढले खुर्द ता. मावळ) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

 

Pune Crime News : बिश्नोईच्या मदतीने संतोष जाधवने मध्यप्रदेशातून 15 पिस्तूल आणले

 

या आरोपींनी संगनमताने हातभट्टीची दारु तयार करण्यासाठी रसायन तयार केले होते. त्यापासून ते गावठी, देशी दारुचा कारखाना चालवून दारु तयार करीत होते. या दोघांकडून 86 हजार रुपये किमतीचा मुद्देमालासह इतर साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. वाघमारे आणि कोळी यांच्याविरोधात शिरगाव परंदवडी पोलिस ठाण्यात महाराष्ट्र दारु कायद्याच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.