Crime News : पन्नास हजारांची लाच घेताना हडपसर पोलिसाला अटक

एमपीसी न्यूज – कुंपणच शेत खाते या म्हणीप्रमाणे कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने 50 हजारांची लाच घेतल्याचे समोर आले आहे. लाचलुचपत विभागाने आज (बुधवारी) केलेल्या कारवाईमध्ये हडपसर (Crime News)  पोलिस ठाण्याच्या पोलीस उपनिरीक्षकाला अटक केली आहे.

 

सागर दिलीप पोमण (वय 34) असे अटक पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.पोमण याने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल कऱण्यास आलेल्या तक्रार दारालाच ही लाच मागितली होती. संबधित तक्रारदाराला आर्थिक व्यवहारातील पैसे परत मिळवून देण्यासाठी 50 हजार रुपयांची लाच (Crime News)  पोमण याने मागितली होती. त्यानुसार कोरेगाव पार्क येथे सकाळी पावणे अकरा वाजता लाच घेत असताना  पोमण याला अटक करण्यात आली आहे.

 

कोरगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून लाचलुचपत विभाग पुणेचे पोलीस उपनिरीक्षक श्रीराम शिंदे पुढील तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.