RTI Extortion Case : 25 लाखांची खंडणी घेताना माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक

एमपीसी न्यूज – महामार्ग बांधकामातील (RTI Extortion Case) कंत्राटदाराकडून 25 लाख रुपयांची खंडणी घेताना तथाकथित माहिती अधिकार कार्यकर्त्याला अटक करण्यात आली आहे. हि कारवाई पुणे आयुक्तालयाच्या खंडणी विभागाने मंगळवारी (दि.19 जुलै) भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याजवळ केली.

दत्तात्रय गुलाबराव फाळके (वय 46 रा. धनकवडी) असे अटक आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी संबधीत कंत्राटदाराने पोलीस तक्रार दिली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फाळके याने अहमदनगर येथील जामखेड तालुक्यात सुरु असलेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाची माहिती काढून घेतली. या माहितीचा गैरवापर करत फाळके याने तेथे कंत्राटी काम करत असलेल्या कंपनीला फोन करुन त्रास देण्यास सुरुवात केली. तुम्हाला काम नीट करायचे असेल, दंड टाळायचा असेल तर मला दोन कोटी रुपये द्या, अशी खंडणी फाळके याने कंपनीकडे मागितली. अन्यथा, प्राधिकरणाकडे तक्रार करेन.

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय पेचावर एक रोजी सुनावणी

अशी धमकी देत वारंवार (RTI Extortion Case) फोन करुन त्रास देत होता. तसेच त्याने जीवे मारण्याची धमकीही तक्रारदाराला दिली होती. याच खंडणीचा काही भाग म्हणून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याजवळ येथे 25 लाख रुपये स्वीकारताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या. भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.