Bhosari News : चांगले विचारच ठरतील उद्याची ओळख – उद्धव महाराज मंडलिक

एमपीसी न्यूज – परमार्थ महान धन असून ते कधी ही संपणार नाही तर ते दिवसेंदिवस वाढतच असते .कोणत्याही क्षेत्रात काम करा पण चांगले विचार अंगीकृत करा. तीच  तुमची उद्याची ओळख आहे, असे विचार उद्धव महाराज मंडलिक यांनी मंगळवार (दि.19) भोसरी येथे मांडले.

राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी येथे कीर्तन महोत्सवात भोसरीचे प्रथम आमदार  विलास विठोबा लांडे यांचे आई- वडील ह भ प स्व.विठोबा सोनबा लांडे व स्व. इंदुबाई विठोबा लांडे यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त महाविद्यालयाच्या प्रांगणात  सहाव्या दिवसाची सेवा हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी समर्पित केली. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास विलास लांडे, मोहिनी लांडे,विश्वनाथ लांडे, संगीता लांडे, हिराबाई विठ्ठल मुंगसे, मिराबाई हिरामण गोडसे, मिराबाई मारुती गुजर, विक्रांत लांडे, शुभांगी लांडे,  विराज लांडे, कांचन लांडे, विनया सुधीर मुंगसे, विशाखा आदित्य शिंदे हे लांडे परिवारातील सदस्य उपस्थित होते .या  कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी  ह.भ.प .पुरुषोत्तम महाराजांनी विशेष योगदान दिले.

 

Maharashtra Politics : महाराष्ट्रातील राजकीय पेचावर एक रोजी सुनावणी

 

आपल्या कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधन करताना हभप उद्धव महाराज मंडलिक यांनी संत तुकाराम महाराजांचा मानवी जीवनाचे महत्त्व, मनुष्य देह मिळाल्यानंतर भक्ती करणे हे परमकर्तव्य आहे ह्या अभंगांचे निरूपण केले. लांडेसाहेबांची आईवडीलांप्रती असणारी निष्ठा वाखाणण्याजोगी आहे . आधुनिकता आणि अध्यात्म एकत्र नांदणे ही दुर्मिळ गोष्ट  लांडे परिवाराकडे आहे. परमार्थ महान धन असून ते कधी ही संपणार नाही तर ते दिवसेंदिवस वाढतच असते .कोणत्याही क्षेत्रात काम करा पण चांगले विचार अंगीकृत करा. तीच  तुमची उद्याची ओळख आहे .प्रज्ञावंत माणसे स्वतःला कधी गरीब समजत नाही.विचारांनी संपन्न माणसे कधीच दरिद्री नसतात, असा उपदेश केला.

या कीर्तन महोत्सवात  विलास लांडे यांनी जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज सुवर्ण मंदिर, श्री क्षेत्र भंडारा डोंगर जीर्णोद्धारसाठी देणगी देण्याचे आवाहन केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन दिपक साकोरे यांनी केले तर नगरसेवक विक्रांत लांडे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.